शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:29 IST

दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी काही तरी नवे घडेल या आशेने तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय, असे ट्विट करत कोरोना महामारी हाताळण्याच्या सरकारी धोरणावर टीका केली होती.

ठळक मुद्देराहुल गांधी यांनी ट्विटरवर कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचा ग्राफ शेअर केला आहे.देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले. तर ३२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी  सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचा ग्राफ शेअर केला आहे. याचबरोबर, "अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", हे या लॉकडाऊनने दाखवून दिल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, "अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार" हे वाक्य महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन यांचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी काही तरी नवे घडेल या आशेने तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय, असे ट्विट करत कोरोना महामारी हाताळण्याच्या सरकारी धोरणावर टीका केली होती. गेल्या शनिवारी देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या चार टप्प्यांमध्ये कोरोना रुग्णांची व मृत्यूंची संख्या कशी सतत वाढत गेली हे दाखविणारे तक्तेही राहुल गांधी यांनी या ट्विटसोबत प्रसिद्ध केले होते.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले. तर ३२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे  भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल ९ हजार ५२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या....

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

CoronaVirus News : अमित शहा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक       

'आत्मनिर्भर पॅकेज' परिपूर्ण नाही; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडूनच प्रश्नचिन्ह

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या