शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Farm Laws : राहुल गांधींनी सुरू केला 'ट्विटर पोल', पंतप्रधान मोदींसंदर्भात दिले 'हे' चार ऑप्शन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 30, 2020 19:51 IST

राहुल गांधींनी आपल्या एका ट्विटच्या माध्यमाने पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला आहे आणि यात प्रश्न विचारला आहे, की पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत कारण?

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी आंदोलन आज 35व्या दिवशीही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीवर शेतरी आंदोलक अडून बसले आहेत. यातच राहुल गांधींनी आपल्या एका ट्विटच्या माध्यमाने पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला आहे आणि यात प्रश्न विचारला आहे की. पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत, कारण ते -

यासाठी राहुल गांधींनी चार पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय - पीएम मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसरा पर्याय - पीएम मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहेत, तिसरा पर्याय - ते हट्टी आहेत आणि चौथा पर्याय - यांपैकी सर्व

शेतकऱ्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास नाही -यापूर्वीही देशातील शेतकऱ्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या काही जुन्या वक्तव्यांचा हवाला देत ट्विट केले, ‘प्रत्येक बँक खात्यात 15 लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, 50 दिवस द्या, अन्यथा.... आपण कोरोना विरोधात 21 दिवसांत युद्ध जिंकू, ना कुणी आपल्या सीमेत घुसखोरी केली आहे, ना कुण्या चौकीवर कब्जा केला आहे.’ ते म्हणाले, ’मोदी जींच्या ‘असत्याग्रहा’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकरी त्यांच्यावर विश्वास करत नाहीत.

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना देणार मोफत Wi-Fi सुविधा - दुसरीकडे, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे. याच दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी सिंघू सीमेवर केजरीवाल सरकार फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. "खराब नेटवर्कमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यामध्ये आणि कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. आंदोलनकर्त्यांकडून ज्या ज्या ठिकाणी वाय-फायची मागणी होईल तिथे हॉट स्पॉट लावले जातील" अशी माहिती राघव चड्ढा यांनी दिली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संप