शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी विजय दर्डा यांना जे सांगितले, ते करून दाखविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:25 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.माजी खासदार विजय दर्डा यांनी अलीकडेच राहुल गांधी यांना एक पत्र लिहून काँग्रेस शासित राज्यांत बेरोजगार, शेतकरी आणि देशातील गरिबांना किमान उत्पन्न देण्याची तरतूद करण्याची सूचना केली होती. विजय दर्डा यांनी आपल्या पत्रासोबत काँग्रेस शासित राज्यांतील सुशिक्षित बेरोजगार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांना किमान उत्पन्नाच्या हमीसाठी आवश्यक निधीची आकडेवारीही दिली होती. याबाबत लवकरात लवकर घोषणा होणे आवश्यक आहे, कारण मोदी सरकार अशाच स्वरूपाची घोषणा करण्यावर विचार करीत आहे, असेही दर्डा यांनी पत्रात नमूद केले होते.माजी खासदार विजय दर्डा यांच्या या पत्राची राहुल गांधी यांनी दखल घेऊन त्यांना तातडीने उत्त्तर पाठविले. त्यात राहुल यांनी म्हटले होते की, ‘बेरोजगार, अल्पभूधारक शेतकरी व गरिबांना किमान उत्पन्न मिळावे यासाठी आपण केलेली सूचना काँग्रेस निवडणूक जाहीरनामा समितीकडे पाठविण्यात आली आहे.’उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, माजी खासदार दर्डा यांच्या घोषणेवर राहुल गांधी यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अर्थतज्ज्ञांशी गंभीर चर्चा केली. त्यानंतर छत्त्तीसगढमधील एका निवडणूक सभेत त्यांनी याबाबत पहिल्यांदा घोषणाही केली. राहुल गांधी यांनी घोषणा केली तेव्हा योजनेची ब्ल्यूप्रिंट तयार झालेली नव्हती. त्यामुळे योजनेची विस्तृत माहिती सार्वजनिक होऊ शकली नव्हती.या आठवड्यात राहुल गांधी यांनी वार्षिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा कमी असलेल्या सर्वच गरिबांना दरमहा किमान ६ हजार रुपये उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ शेतकरी असो वा विद्यार्थी अथवा व्यावसायिक सर्वच गरिबांना होणार आहे.आपल्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल माजी खासदार दर्डा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या सूचनेचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचे जे वचन राहुल गांधी यांनी पत्राद्वारे दिले होते, ते पूर्णही केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक