शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:04 IST

'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते

बंगळुरु, दि. 16 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याची टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते. 

राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सांगितलं की, 'त्यांनी जम्मू काश्मीरध्ये हिंसा आणि द्वेष पसरवला आहे. यामुळे पाकिस्तानचा फायदा झाला आहे'. राहुल गांधी यांनी यावेळी दावा केला आहे की, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत मिळून कोणताही तमाशा किंवा ड्रामा न करता काश्मीरच्या मुद्द्यावर काम केलं होतं. 'पी चिदंबरम आणि जयराम रमेश सारख्या नेत्यांनी काश्मीरसाठी 10 वर्ष काम केलं, पण मोदी सरकारने त्यांचे हे सर्व प्रयत्न वाया घालवले आहेत', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी सांगितलं की, '2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने काश्मीर मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काश्मीर मुद्दा जळत होता. 10 वर्ष जम्मू काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळालं हे मनमोहन सरकारचं यश होतं'. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काश्मीर समस्येचाही मुद्दा उपस्थित केला होता. 'दहशतवाद्यांविरोधात कोणतीही नरमाईची भूमिका स्वीकारणार नाही. काश्मीरमध्ये जे काही होत आहे त्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की,  'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', अशी भूमिका मोदींनी काश्मीरबाबत मांडली.

गोळीबार हा काश्मीर समस्येवर उपाय नाही, असे यावेळी मोदींनी सांगितले होते. जम्मू काश्मीरचा विकास, सामान्य नागरिकांची स्वप्नं पूर्ण करण्याचा संकल्प आहे. शिवाय,  दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी