शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: सुरत सत्र न्यायालयाचा राहुल गांधी यांना धक्का, शिक्षेला स्थगिती नाही; आता हायकाेर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:58 IST

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून झालेल्या मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. त्याविरुद्ध राहुल गांधी उच्च न्यायालयात जाणार आहेत.

सुरत/नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून झालेल्या मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. त्याविरुद्ध राहुल गांधी उच्च न्यायालयात जाणार आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. मोगेरा यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची शिक्षेविरुद्धची याचिका फेटाळून लावली. कनिष्ठ न्यायालयाच्या २३ मार्चच्या निकालाविरुद्धच्या अपिलावर सुनावणीसाठी सत्र न्यायालयाने २० मे ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाच्या ३ एप्रिलच्या आदेशानुसार काँग्रेस नेते त्यांच्या मुख्य अपिलाचा निकाल लागेपर्यंत जामिनावर बाहेर असतील. गांधी यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की, राहुल गांधी यांनी आपल्या शब्दांबाबत अधिक सावधगिरी बाळगायला हवी होती; कारण ते संसद सदस्य होते आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राजकीय पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष होते. अपीलकर्त्यासारख्या व्यक्तीकडून उच्च नैतिकतेचा दर्जा अपेक्षित आहे. बदनामीकारक शब्द एखाद्या पीडित व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी पुरेसे आहेत.

निकाल अपेक्षितच!n काँग्रेसचे प्रवक्ते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, सत्र न्यायालयाच्या आदेशाला लवकरच आव्हान दिले जाईल. n राहुल गांधी यांचा आवाज एवढ्या सहजपणे रोखला जाऊ शकत नाही. ते जनहिताचे मुद्दे उपस्थित करीत राहतील. n राहुल गांधी यांनाही या आदेशाची अपेक्षा होती; त्यामुळे त्यांनी आधीच सरकारी निवासस्थान रिकामे केले.

राहुल गांधी यांनी आपल्या शब्दांबाबत अधिक सावधगिरी बाळगायला हवी होती.    ˘- न्यायाधीश

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस