लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी अचानक पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना आणि देशाला युद्ध सज्जतेचा इशारा दिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राहुल गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पीएमओमध्ये सीबीआय संचालक नियुक्तीसाठी नेमलेल्या समितीच्या पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिले. सरन्यायाधीश संजीव खन्नाही उपस्थित होते. सीबीआयचे विद्यमान संचालक प्रवीण सूद यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी समाप्त होत आहे. तत्पूर्वी ही बैठक झाली.
अशी होते नियुक्तीसीबीआय संचालकांची नेमणूक केली जात असताना मंत्रिमंडळाने नियुक्त केलेली समिती शिफारस करते. यात पंतप्रधान, देशाचे सरन्यायाधीश व लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. समिती एका नावावर चर्चा करून तशी शिफारस केंद्र सरकारकडे करते.