शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

"राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त हुशार; त्यांच्याकडे पंतप्रधान होण्याचे सर्व गुण"- सॅम पित्रोदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:43 IST

"राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. पण, राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे.

Sam Pitroda on Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या अगदी जवळ असलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. यावेली त्यांनी राहुल गांधी आणि दिवंगत राजीव गांधी यांची थेट तुलना केली. "राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त  हुशार आहे. बौद्धिक असण्यासोबतच ते एक उत्तम रणनीतीकारदेखील आहेत. राजीव जास्त मेहनती होते. दोघांचा डीएनए एकच आहे. दोन्ही नेते आयडिया ऑफ इंडियाचे पुरस्कर्ते आहेत," अशी प्रतिक्रिया पित्रोदा यांनी दिली.

राजीव आणि राहुल यांना जनतेची काळजी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा शिकागो येथे पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "मी राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव, मनमोहन सिंग, व्हीपी सिंह, चंद्रशेखर आणि एचडी देवेगौडा यांसारख्या अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. मला अनेक माजी पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मिळाली, पण कदाचित राहुल आणि राजीव यांच्यातील फरक हा आहे की, राहुल अधिक बुद्धिवादी, विचारवंत आहेत. राजीव जरा जास्तच मेहनती होते. त्यांचा डीएनए एकच आहे. त्यांना लोकांबद्दल समान काळजी आणि भावना आहेत. ते खरच खूप साधे लोक आहेत. त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही वैयक्तिक आकांशा नाहीत."

राहुलची प्रतिमा डागाळली "राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. पण, राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे. त्यांच्या दोन भारत दौऱ्यांचा यात खूप फायदा झाला. याचे संपूर्ण श्रेय मी राहुलला देतो. राहुल बराच काळ लढले आणि यातून बाहेर आले. त्यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत. एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या वारशावर, पक्षावर दिवसरात्र हल्ला करणे वाईट आहे. हे लोक जाणूनबुजून खोटं बोलतात, फसवतात आणि चुकीची माहिती पसरवतात. माध्यमांवर कुणाचे तरी नियंत्रण असल्याचे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे," असेही पित्रोदा यावेळी म्हणाले.

राहुल सरकारवर टीका करतात, भारतावर नाहीपित्रोदा पुढे म्हणतात, "परदेश दौऱ्यांदरम्यान केंद्रावर टीका करणाऱ्या राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपची टीका निराधार आहे. सरकारवर टीका करणे म्हणजे भारतावर टीका करणे नव्हे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका करायला हरकत नाही. काँग्रेसच्या संस्थापकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, त्या भारतावर पक्षाच्या प्रत्येक नेत्याचा विश्वास आहे." दरम्यान, राहुल गांधी 8-10 सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असून, यात ते विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतील, अशी माहितीही पित्रोदा यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान