शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:53 IST

अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Rahul Gandhi, Modi Govt No trust motion: काही लोक म्हणतात हा एक देश आहे, काही म्हणतात हा वेगवेगळ्या भाषांचा देश आहे. काही म्हणतात की हा धर्म आहे, हे सोने आहे, हे चांदी आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की या देशाचा आवाज एकच आहे. हा भारत देश एक आवाज आहे. भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवावाच लागेल. हा आवाज ऐकायचा असेल तर आपला अहंकार, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतील. तरच तो आवाज ऐकू येईल, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाप्रणित एनडीए सरकारवर घणाघात केला. मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.

गांधी पुढे म्हणाले, "भारत हा एक संपूर्ण देश आहे. त्याचा आवाज एक आहे. या आवाजाची हाक तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर तुम्हाला तुमचा अंहकार बाजूला ठेवावा लागेल. मी रोज ८-१० किमी रनिंग (धावणे) करायचो. त्यामुळे मी सहज २०-२५ किमी चालू शकतो असे मला वाटायचे. माझ्यात तो अहंकार होता. पण जेव्हा मी तसे करायचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यातला अहंकार क्षणात नष्ट झाला. कारण दोन-तीन दिवसांतच माझे गुडघे इतके दुखू लागले की माझा अहंकार निघून गेला. माझा अहंकार लांडग्याएवढा मोठा होता, तो अगदी मुंगीएवढा शिल्लक राहिला."

"मी भारत जोडो यात्रा केली. या यात्रेदरम्यान एका शेतकऱ्याने कापसाचा गठ्ठा दिला. तो मला म्हणाला की, राहुलजी माझ्याकडे हेच राहिले आहे. बाकी काही राहिले नाही. मी शेतकऱ्याला विचारले की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही... भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्याच्या हृदयातील वेदना मला जाणवल्या. त्याची वेदना माझी वेदना बनली. त्याचाच अर्थ हा सारा प्रकार योग्य नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.

"मणिपूरमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. भाजपा सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची आणि भारतमातेची हत्या केली. तुम्ही लोक देशद्रोही आहात, तुमचे या देशावर किंवा देशातील लोकांवर प्रेम करत नाही," असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केली.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधी