Rahul Gandhi Letter to PM Modi : देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. पंतप्रधान मोदींना देशविदेशातून सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या दीर्घायुष्यासाठीही सदिच्छा व्यक्त केल्या. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवरून शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर आता राहुल गांधी यांनी मोदींना एक विशेष पत्र लिहिले आहे. हे पत्र विशेष यासाठी आहे, की कारण त्या पत्रात मोदींच्या वाढदिवसाचा संदेश नसून, एक विशेष मागणी करण्यात आली आहे.
पत्रात काय?
पंजाबमध्ये पूर आणि पावसाने कहर केला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत, अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत आणि पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तथापि, परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्र सरकारच्या १,६०० कोटी रुपयांच्या मदतीला अपुरी असल्याचे म्हटले आहे आणि व्यापक मदत पॅकेजची मागणी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने जाहीर केलेली १,६०० कोटी रुपयांची सुरुवातीची मदत ही पंजाबमधील लोकांवर घोर अन्याय आहे. त्यांनी सांगितले की, राज्याचे किमान २०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असा अंदाज आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अधिक ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सरकारने नुकसानीचे त्वरित मूल्यांकन करून व्यापक मदत पॅकेज द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.