अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवल्याचा दावा करत मोदींचा ५० वेळा अपमान केला. मात्र मोदी भित्रे आहेत. ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे म्हणण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. १९७१ मध्ये अमेरिकेने बांग्लादेश मुक्तिसंग्रामाच्या युद्धावेळी आपल्या नौदलाची सातवी तुकडी भारताकडे पाठवली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी निर्भयपणे सांगितले होते, आम्ही तुमच्या नौदलाला घाबरत नाही, आम्ही आमचे काम करू. इंदिरा गांधी एक महिला होती, पण या मर्दापेक्षाही (मोदींपेक्षा) अधिक धाडस त्या महिलेत (इंदिरा गांधी) होतं. असे म्हणत काँग्रेसे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधाला. ते गुरुवारी नालंदा येथील सभेत बोलत होते.
मोदी ट्रम्प यांना भेटण्यासाठी परदेशात जाणार होते, पण... -राहुल गांधी पुढे म्हणाले, “आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले, सात विमाने पाडली होती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पण मोदी एकदाही म्हणाले नाही की, ट्रम्प खोटे बोलत आहेत.” एवढेच नाही तर, "मोदी ट्रम्प यांना भेटण्यासाठी परदेशात जाणार होते, पण भीतीपोटी गेले नाहीत," असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
नीतीश कुमार बिहार सरकार चालवत नाहीत; तर... - -यावेळी राहुल गांधी यांनी बिहार सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “नीतीश कुमार बिहार सरकार चालवत नाहीत; तर मोदी, अमित शाह आणि नागपूर (आरएसएस) चालवते. मोदीजींच्या हातात नीतीश कुमार यांचे रिमोट आहे. ते जे बटण दाबतात, तोच चॅनेल नीतीश चालू करतात.”
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास नालंदा पुन्हा एकदा जागतिक शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी पुन्हा एकदा छठ पूजेचा उल्लेख करत, दिल्लीतील छठ पूजेसाठी पंतप्रधान मोदींसाठी यमुनेजवळ खास स्वच्छ पाण्याचा तलाव तयार करण्यात आला होता, अशेही राहुल गांधी म्हणाले.
Web Summary : Rahul Gandhi attacked PM Modi, citing Indira Gandhi's courage during the 1971 Bangladesh war. He accused Modi of being afraid to contradict Trump's claims and alleged Nitish Kumar is controlled by Modi and the RSS.
Web Summary : राहुल गांधी ने पीएम मोदी पर हमला करते हुए कहा कि इंदिरा गांधी 1971 के बांग्लादेश युद्ध के दौरान अधिक साहसी थीं। उन्होंने मोदी पर ट्रम्प के दावों का खंडन करने से डरने और नीतीश कुमार को मोदी और आरएसएस द्वारा नियंत्रित करने का आरोप लगाया।