शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राहुल गांधींना पुन्हा आली ज्योतिरादित्यांची आठवण; शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 09:04 IST

खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती. 

ठळक मुद्दे काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये सहभागी झाल्यानंतर काही तासांतच राहुल गांधींना आपल्या मित्राची पुन्हा एकदा आठवण आली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्विट केला आहे. ज्यात राहुल गांधी यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ दिसत आहेत.

नवी दिल्लीः काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये सहभागी झाल्यानंतर काही तासांतच राहुल गांधींना आपल्या मित्राची पुन्हा एकदा आठवण आली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्विट केला आहे. ज्यात राहुल गांधी यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ दिसत आहेत. राहुल गांधींनी रिट्विट केलेल्या फोटोसोबत एक मजकूरही लिहिला आहे. 'धैर्य आणि वेळ हे दोन शक्तिशाली योद्धे आहेत- लियो टॉल्‍सटॉय', असा उल्लेख त्या मजकुरात आहे. खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती. मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीतमाध्यमांनी जेव्हा राहुल गांधींना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, मी आणि ज्योतिरादित्य चांगले मित्र आहोत. तसेच आम्ही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. माझ्या घरी कुठल्याही वेळी येऊ शकले अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. दरम्यान, देशाच्या इतिहासात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला जनादेश आजवर कुणालाही मिळालेला नाही. भारताचं भविष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित आहे. त्यांनी भारताचं नाव जगात पोहोचवलं आहे. मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले होते.

ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश

MP Govt Crisis: ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेत; मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर

ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण...

'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'

माझ्या आयुष्यात 2 तारखांना अतिशय महत्त्व आहे, 30 सप्टेंबर 2001 रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं. तर, दुसरी तारीख 10 मार्च 2020 जी वडिलांची 75 वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतलाय. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणं हेच उद्देश असायला हवं, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा. माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपाता काम सुरू करतोय, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. ''काँग्रेस पहिल्यासारखी राहिली नाही. सध्या, जनसेवेचा उद्देश काँग्रेस संघटनेतून पूर्ण होत नाही, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वावर शिंदेंनी टीका केलीय. 'एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं, जेव्हा 2018 मध्य प्रदेशमध्ये सरकार बनवलं होतं. पण, 18 महिन्यातंच सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. शेतकरी कर्जमाफी, बोनस, पिकविमा हे देण्यात आम्ही गेल्या 18 महिन्यात असफल ठरलोय, असे म्हणत मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेतृत्वाचं अपयश शिंदे यांनी सांगितलं. तसेच, मोदींचं कौतुक करताना, देशाच्या विकासासाठी मोदींमसमवेत काम करणार असल्याचे शिंदेंनी म्हटले. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेश