शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 06:27 IST

महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत असून, ते राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांचे फोन घेणेही आता बंद केले आहे.पक्षाच्या २५ व २७ मे रोजी झालेल्या बैठकांनंतर राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांना भेटही दिलेली नाही. काही नेते काल, मंगळवारी त्यांना भेटण्यास त्यांच्या निवास्थानी गेले होते, पण त्यांना टाळून राहुल गांधी आपल्या होंडा कारमधून निघून गेले. बाहेर जाताना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनाही कळविले नव्हते. नंतर ते प्रियांका गांधी यांच्या लोधी इस्टेटभागातील घरी दिसले. नेत्यांशी बोलण्यास, भेटण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याने प्रियांका गांधीच नेत्यांशी चर्चा करीत आहेत.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची बित्तंबातमी माध्यमांना मिळाल्याने ते संतापले आहेत. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना ज्योतिरादित्य सिंदिया लंडनला गेल्याबद्दल राहुल यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. काही नेत्यांनी आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी कसा आग्रह धरला, याचा उल्लेख त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. बैठकीतील काही भागच एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. त्यामुळे ती फित काँग्रेस नेत्याकडूनच गेली, अशी राहुल गांधी यांची खात्री आहे.हंगामी अध्यक्षपदासाठी गुलाम नबी आझाद, ए. के. अँथनी यांची नावे पुढे येत आहेत. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे समजते. मोतिलाल व्होरा व शीला दीक्षित ही नावेही घेतली जात आहेत. पण त्यांना पक्षाची सूत्रे सोपवली जातील का, ही शंका आहे.>कार्यकर्त्यांचे धरणेराहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी काँग्रेसचे २0 कार्यकर्ते आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यातघेऊ न पोलीस ठाण्यात नेले. त्यांनासोडून देण्यात आल्यावर ते कार्यकर्तेपुन्हा राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९