शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार, कार्यकारिणीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:05 IST

Rahul Gandhi : राहुल यांच्या भूमिकेने अध्यक्षपदाबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता संपेल. मात्र काँग्रेसमध्ये संसदीय मंडळाची स्थापना करावी तसेच कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या मागण्यांवर २३ असंतुष्ट नेते कायम आहेत. 

-   शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेसचे पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यास राहुल गांधी तयार आहेत. असंतुष्ट नेत्यांशी चर्चा करून काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विद्यमान पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसची बैठक बोलावली होती. त्यात असंतुष्ट नेत्यांचे काही प्रमाणात मतपरिवर्तन करण्यात सोनिया गांधी यांना यश आले आहे.राहुल यांनी बैठकीत सांगितले की, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती स्वीकारण्यास आपण तयार आहोत. राहुल यांच्या भूमिकेने अध्यक्षपदाबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता संपेल. मात्र काँग्रेसमध्ये संसदीय मंडळाची स्थापना करावी तसेच कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या मागण्यांवर २३ असंतुष्ट नेते कायम आहेत. 

तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधावा - प्रियांका गांधीया बैठकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सांगितले की, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे मत प्राधान्याने जाणून घेतले पाहिजे. त्यांच्याशी काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे. 

प्रदेशाध्यक्षांचे अधिकार वाढवा - पी. चिदंबरम माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये बुथ स्तरावरील कमिट्यांची स्थापना करून त्यांना मजबूत करावे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारांत वाढ करण्यात आली पाहिजे.

चिंतन शिबिरही भरविणार पंचमढी, सिमला येथे पूर्वी काँग्रेस पक्षाची दोन ते तीन दिवसांची चिंतन शिबिरे झाली होती. त्याच धर्तीवर पक्षाचे लवकरच एक चिंतन शिबिर आयोजिण्यात यावे, अशी सूचनाही असंतुष्ट नेत्यांनी या बैठकीत केली. त्याला सोनिया गांधी यांनी होकार दिला आहे.

निवडणुकांचा विचार योग्यबैठकीला अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, बी.एस. हुड्डा, अंबिका सोनी, पी. चिदंबरम, शशी थरूर, राहुल गांधी, प्रियांका गांधी आदी उपस्थित होते. संघटनात्मक निवडणुका घेण्याचा विचार योग्य असल्याचे सोनिया गांधी यांनी या वेळी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस