शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 17:33 IST

Rahul Gandhi on Vote Chori: राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर शंका उपस्थित केल्या.

Rahul Gandhi on Vote Chori: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जर्मनीत केलेल्या वक्तव्यांमुळे देशातील राजकारण तापले आहे. राजधानी बर्लिनमधील हर्टी स्कूल येथे 18 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) वर संविधानाची मूलभूत भावना संपवण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यांवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत चौफेर टीका केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी 17 ते 19 डिसेंबरदरम्यान जर्मनी दौऱ्यावर होते. 18 डिसेंबर रोजी राहुल म्हणाले, संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देते, म्हणून भाजप हे संपवू इच्छिते. याशिवाय त्यांनी आरोप केला की, देशातील अनेक संस्थात्मक यंत्रणा भाजपच्या ताब्यात असून, सरकार ईडी आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे.

निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह

राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर शंका उपस्थित केल्या. त्यांनी दावा केला की, हरियाणामध्ये काँग्रेस निवडणूक जिंकली होती, मात्र निकाल बदलण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील निवडणुका निष्पक्ष नव्हत्या. देशातील कोट्यवधी नागरिकांची विचारधारा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा वेगळी असूनही त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसकडून व्हिडिओ प्रसिद्ध

काँग्रेस पक्षाने सोमवारी रात्री या संवादाचा सुमारे एक तासाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी परदेशातही लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाचीच भूमिका मांडली आहे, जी ते देशांतर्गत सातत्याने मांडत आले आहेत.

भाजपचा आक्रमक प्रतिवाद

राहुल गांधींच्या वक्तव्यांवर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी परदेशी भूमीवरून भारताविरोधात वक्तव्य करणे म्हणजे देशाचा अपमान असल्याचे म्हटले. जगातील 29 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान दिला आहे, तर राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले की, RSS समजून घेण्यासाठी राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी राहुल गांधींना ‘बालिश’ म्हणत, अधिवेशन सुरू असताना परदेशात जाऊन देशाविरोधात वक्तव्य करणे गैरजबाबदार असल्याचे म्हटले. याशिवाय, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी करत, देशविरोधी शक्तींशी संबंध असल्याचा आरोप केला.

हर्टी स्कूलवरूनही आरोप

भाजपने राहुल गांधींच्या जर्मनी दौऱ्याबाबत आणखी एक गंभीर आरोप केला आहे. गौरव भाटिया यांनी दावा केला की, राहुल गांधी ज्या हर्टी स्कूलमध्ये बोलले, तेथील प्राध्यापिका कॉर्नेलिया वोल यांचे संबंध अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोसशी संबंधित संस्थांशी आहेत. भाजपचा आरोप आहे की, सोरोस भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, काँग्रेस त्यांच्याशी अप्रत्यक्षरित्या जोडलेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's 'Vote Theft' Allegations in Germany Spark BJP's Strong Retort

Web Summary : Rahul Gandhi accused BJP of undermining the constitution and manipulating elections in Germany, triggering strong condemnation from BJP leaders who accused him of defaming India abroad and aligning with anti-national forces. BJP also linked the Hertie School to George Soros.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग