शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधीच्या राजीनाम्यावर प्रियंका गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 09:28 IST

राहुल गांधींनी काल ट्विटरवर राजीनाम्याचं पत्र स्पष्ट केलं

नवी दिल्ली: काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नसल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची स्वीकारत राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांच्या या निर्णयाचं प्रियंका गांधींनी समर्थन केलं आहे. राहुल गांधींसारखं धाडस फार कमी लोक दाखवतात, असं प्रियंका यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. त्यामुळे राहुल यांच्याप्रमाणेच प्रियंका यांनीही पक्षातील इतर नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.काल राहुल गांधींनी ट्विटरवर त्यांचा 4 पानी राजीनामा शेअर केला. राजीनाम्यावर ठाम असल्याचं राहुल यांनी ट्विटमधून पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मात्र, अद्याप काँग्रेसनं नव्या अध्यक्षांची निवड केलेली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू आहे. काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. तसंच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही आपलं पद हटवलं. ट्विटर अकाऊंटवरील बायोटेडातून राहुल यांनी काँग्रेस प्रेसिडेंट हा उल्लेख काढून टाकला. त्यामुळे ट्विटरवरही केवळ काँग्रेस पक्षाचा सदस्य आणि लोकसभा सदस्य असंच पद लिहिलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस