शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 20:37 IST

'भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.'

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलताना चीनचे कौतुक केले. चीन हा शांततेचा देश आहे. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चीनच्या रणनीतीचाही उल्लेख केला. तसेच, चीनने केलेल्या विकासाबद्दल आणि पाश्चिमात्य देशांच्या विचारसरणीवरही भाष्य केले.

राहुल चीनबद्दल काय म्हणाले?राहुल गांधी म्हणाले की, चीनमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची पायाभूत सुविधा(रेल्वे, विमानतळ)  दिसते, ती सर्व निसर्गाशी, नदीच्या शक्तीशी जोडलेली आहे. चीनचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. अमेरिकेचा विचार केला तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. चीनला शांततेत किती रस आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. सध्या भारत आणि अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे, असेही राहुल म्हणाले.

जम्मू-काश्मीरबाबत राहुल यांचे वक्तव्यराहुल यांनी आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी जम्मू-काश्मीरला 'तथाकथित हिंसक ठिकाण' म्हटले. काश्मीर हे बंडखोरी प्रवण राज्य आहे आणि तथाकथित हिंसक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आमचे 40 जवान शहीद झाले, त्या ठिकाणीही मी गेलो होतो. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठात राहुल यांनी दिलेली इतर अनेक विधानेही चर्चेचा विषय बनली आहेत. पेगाससबाबतही त्यांनी आपते मत मांडले आहे.

केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख

भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे राहुल म्हणाले. माझ्या फोनमध्येही पेगासस होता. मला अधिकाऱ्यांनी फोनवर काळजीपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला होता. कारण फोन रेकॉर्ड केले जात होते. भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले. अशा प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले, जे अजिबात मी केले नाहीत, असेही राहुल म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनJammu Kashmirजम्मू-काश्मीर