रांची : मोदी आडनावाबद्दल केलेल्या शेरेबाजीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल झालेल्या खटल्यात त्यांना झारखंडमधील रांची न्यायालयाने अंतिम समन्स जारी केले आहे. ४ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. न्यायालयात हजर न राहण्याची सवलत द्यावी, असा राहुल गांधी यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. याआधी मोदी आडनावासंदर्भात खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरविले होते.
न्यायालयात हजर व्हा, राहुल गांधी यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:44 IST