शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Rahul Gandhi on ED: 'नरेंद्र मोदींना घाबरत नाही, काय करायचं ते करा', ED कारवाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:00 IST

Rahul Gandhi: ईडीच्या कारवाईवरुन गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचा गदारोळ, खासदारांनी राज्यसभेत घोषणाबाजी.

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेल्या तपासावरुन काँग्रेस आणि भाजप आमन-सामने आले आहेत. काँग्रेसकडून भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या कारवाईवरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ''आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबात घाबरत नाही. काय करायचे ते करा, आम्हाला पर्वा नाही. दबाव आणून आम्हाला ते गप्प करू शकत नाही. लोकशाही वाचवणे हे आमचे काम आहे, असा हल्लाबोल राहुल यांनी केला. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर बोलताना आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'इतिहास साक्षी आहे, 'हर घर तिरंगा' मोहीम चालवणारे 52 वर्षे तिरंगा न फडकावलेल्या देशद्रोही संघटनेतून बाहेर पडले आहेत. स्वातंत्र्यलढ्यापासून ते काँग्रेस पक्षाला रोखू शकले नाहीत आणि आजही रोखू शकणार नाहीत.'आम्ही लढत राहणार : खरगेईडीच्या कारवाईबाबत गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसनेही गदारोळ केला. या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी राज्यसभेत घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'मला ईडीचे समन्स मिळाले आहेत. त्यांनी मला रात्री 12.30 वाजता चौकशीसाठी बोलावले. मला कायद्याचे पालन करायचे आहे. पण संसदेच्या चालू अधिवेशनात त्यांनी मला बोलावणे योग्य आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरांचा पोलिसांनी घेराव करणे योग्य आहे का? आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढ राहू.'

काँग्रेसमध्ये संतापनॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची जवळपास 12 तास चौकशी केली. ईडीने राहुल गांधी यांचीही दीर्घकाळ चौकशी केली. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने आपला तपास पुढे करत बुधवारी दिल्लीतील हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियनचे कार्यालय सील केले आहे. या कारवाईमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय