शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'इथे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे अंबानींच्या लग्नात फोटोसेशन सुरू आहे'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 14:27 IST

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न गुजरातच्या जामनगरमध्ये होत आहे. यावरुन राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Rahul Gandhi News:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या मध्य प्रदेशात पोहोचली आहे. यावेळी राहुल यांनी अनंत अंबानी यांच्या लग्नावरुन सरकारवर जोरदार घणाघात केला. 'अंबानींच्या घरात लग्न आहे, तिथे लोक सेल्फी काढत आहेत आणि तुम्ही इथे उपाशी मरत आहात,' अशी टीका राहुल यांनी केली.

ग्वाल्हेरमध्ये लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'राहुल गांधी काय बोलत आहेत, ते कुठे दाखवणार? सध्या टीव्हीवर फक्त अंबानींच्या मुलाचे लग्न दाखवले जात आहे. लग्न मोठ्या थाटामाटात सुरू आहे, जगभरातून लोक येत आहेत, सेल्फी काढत आहेत आणि तुम्ही लोक इथे उपाशी मरत आहात,' असंही राहुल यावेळी म्हणाले. 

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडीराहुल गांधी पुढे म्हणतात, 'भारत जोडो यात्रेनंतर आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली. या प्रवासात आम्ही 'न्याय' हा शब्द जोडला, कारण देशात पसरत असलेल्या द्वेषाचे कारण 'अन्याय' आहे. सध्या देशातील बेरोजगारी 40 वर्षांतील सर्वात जास्त आहे. भारतात पाकिस्तान, बांग्लादेश आणि भुटानपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीच्या माध्यमातून छोटे उद्योग उद्ध्वस्त केले. '

जात जनगणनेवर प्रतिक्रिया...यावेळी राहुल यांनी पुन्हा एकदा जात जनगणनेच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. 'देशात सुमारे 50% ओबीसी, 15% दलित आणि 8% आदिवासी लोक आहेत. देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात ओबीसी, दलित आणि आदिवासी वर्गातील एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार देशातील 73% लोक मोठ्या रुग्णालये आणि खाजगी शाळांच्या व्यवस्थापनात दिसत नाहीत, परंतु मनरेगा आणि कंत्राटी कामगारांच्या यादीत दिसतील. पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या, त्यामुळे या 73% लोकांचा सहभाग असायचा, आता सर्व काही खाजगी केले जात आहे', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक