शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधी हिंदू नाही ख्रिश्चन, 10 जनपथमध्ये देखील आहे चर्च'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:23 IST

राहुल गांधींनी पहिले ते हिंदू आहेत हे घोषीत करावं. ते जोपर्यंत हिंदू आहेत हे घोषीत करत नाही तोपर्यंत  मी विश्वास ठेवणार नाही. मला तर ते ख्रिश्चन असल्याची शंका आहे.

नवी दिल्ली - नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भाजपाचे नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीवर कडाडून टीका केली आहे. स्वामींनी राहुल गांधींच्या धर्मावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मला शंका आहे की राहुल गांधी ख्रिश्चन आहेत आणि 10 जनपथमध्ये देखील एक चर्च आहे अशी विखारी टीका स्वामींनी केली आहे. या नव्या वादग्रस्त विधानामुळे स्वामी पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.    

राहुल गांधी यांनी नुकताच तीन दिवसांचा गुजरात दौरा संपवला आहे. या दरम्यान त्यांनी पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले. राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली. विशेष म्हणजे चामुंडा देवी मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी मंदिराच्या एक हजार पाय-या चढल्या. राहुल यांच्या मंदिरात जाण्यावर टीका करताना स्वामी म्हणाले, राहुल गांधींनी पहिले ते हिंदू आहेत हे घोषीत करावं असं म्हटलं आहे. ते जोपर्यंत हिंदू आहेत हे घोषीत करत नाही तोपर्यंत  मी विश्वास ठेवणार नाही. मला तर ते ख्रिश्चन असल्याची शंका आहे. त्यांच्या घरात 10 जनपथमध्ये एक चर्च असल्याचीही मला शंका आहे अशी झोंबणारी टीका स्वामी यांनी यावेळी केली. 

स्वामींशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष जितू वघानी यांनीही राहुल गांधीवर टीका करताना 'गरब्यात आरती कशी करायची, दर्शन कसं घ्यायचं याबाद्दल राहुल गांधींना काहीच माहिती नाही. काँग्रेस नेत्यांना त्यांची मदत करावी लागली असं म्हटलं होतं.

राहुल गांधींची हिंदुत्वाची खेळी, तीन दिवसांच्या दौ-यात पाच मंदिरांना भेट-जरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या सौराष्ट्रचा तीन दिवसांचा वादळी दौरा करत नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नवसृजन यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपाकडून काँग्रेसवर लावण्यात आलेल्या अनेक आरोपांचंही उत्तर दिलं. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासोबत हिंदुत्व कार्ड खेळलं. पटेल समाजासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या कागवाड गावातील खोडलधाम येथेही ते गेले होते. येथे पटेल समाजातील लोकांनी एक भव्य मंदिर बांधलेलं आहे. राजकोटला परतल्यानंतर राहुल गांधी जलाराम बापा मंदिरात गेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार, राहुल गांधी या मंदिराला भेट देण्याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राहुल गांधी यांच्या यात्रेवर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ता मनीष दोषी यांनी सांगितलं की, 'भाजपा आणि आरएसएसचे लोक जाणुनबुजून काँग्रेसला हिंदू विरोधी सांगत असतात. राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट देत केलेला दौरा हा त्यांना उत्तर आहे'.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी