शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, भाजपाविरोधी आघाडीसाठी खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 10:02 IST

भाजपाविरोधी आघाडीसाठी राजधानीत खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुल यांनी बुधवारी (14 मार्च) संध्याकाळी 6 जनपथवर जाऊन भेट घेतली.

नवी दिल्ली -   भाजपाविरोधी आघाडीसाठी राजधानीत खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुल यांनी बुधवारी (14 मार्च) संध्याकाळी 6 जनपथवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील राजकीय स्थितीवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. फुलपूर व गोरखपूरच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही भेट झाल्यानं राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहेत.  या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.  

या भेटीदरम्यान त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर उपस्थित असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. गोरखपूर व फूलपूरच्या पोटनिवडणुकीच्या मुद्याची या बैठकीत चर्चा झाली. समाजवादी पक्ष-बसपाने केलेला युतीचा फार्म्युला अन्य राज्यांतही अंमलात आणल्यास भाजपाचा पाडाव होऊ शकतो, असे पवार म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यावर राहुल यांनी काँग्रेस त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच भाजपाची देशभरात सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी आता विरोधी पक्षांची एकजूट होण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोनिया गांधींचीही खेळी

तर दुसरीकडे,  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मेजवानीस शरद पवार, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता विरोधी पक्षांमध्ये एकजूट झाल्यास 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी आणि शाह या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीला काँग्रेससह 20 पक्षांचा समावेश होता. 

विविध गटांत विभागलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी दिल्लीत निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल काँन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, सपाचे रामगोपाल यादव यांच्यासह प्रादेशिक पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना भोजनासाठी निमंत्रित केले  होते. 

2019 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना मजबूतपणे उभं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विरोधकांनी एकत्र येत लढल्यास मोदी लाट रोखता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. 16, 17 आणि 18 मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार