शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जन आक्रोश रॅलीत भाजपाला घेरणार काँग्रेस, राहुल गांधी करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 08:42 IST

मोदी सरकारवर दिवसेंदिवस जनतेचा वाढत चाललेल्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारविरोधात दिवसेंदिवस जनतेच्या वाढत चाललेल्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे. या जन आक्रोश रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, भाजपालाही घेरण्याचा त्यांचा इरादा आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसनं नवी दिल्लीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या सार्वजनिक रॅलीचं आयोजन केलं आहे.या रॅलीमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीची झलक पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत म्हणाले, या रॅलीला जे नाव दिलं आहे जन आक्रोश रॅली, त्यातून एक वेगळाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व स्तरांतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं चित्र निर्माण झालंय. असं भीतीदायक वातावरण, दहशतवादाचं वातावरण, तिरस्काराचं वातावरण, द्वेषाचं वातावरण, हिंसेचं वातावरण आधी कधीच नव्हतं. देशात महागाई आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दराला तर आग लागलेली असून, सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. मोदींनी दिलेली आश्वासनं त्यांना चार वर्षांत पूर्ण करता आलेली नाहीत. स्मार्ट सिटीचा अद्याप काहीही थांगपत्ता नाही. न्याय व्यवस्थेची स्थितीसुद्धा चिंताजनक आहे, असंही गेहलोत म्हणालेत. देशातील लोकांच्या विचारांचं प्रतिबिंब या रॅलीतून पाहायला मिळणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग संबोधित करणार आहेत. या रॅलीसाठी राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच रॅलीच्या आयोजनावर प्रियंका गांधी नजर ठेवून आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी