शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"जगभरात भारताचं वाढतं असलेलं महत्त्व कमी करण्याचं काम राहुल गांधी करतायंत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:04 IST

जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी भारतीयांची भेट घेत, त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेबद्दल माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली. "काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची सामान्य साधने (जसे की जाहीर सभा, लोकांशी बोलणे, रॅली) काम करत नाहीत हे आपण पाहिलं होतं. राजकारणासाठी गरज असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत.", असे राहुल गांधींनी यावेळी म्हटले. आता, राहुल गांधींच्या या विदेश दौऱ्यावरुन भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी टोला लगावलाय. 

"जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे. हा एक आजार आहे की भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहीत आहे. मला वाटतं की त्यांना देवापेक्षा जास्त माहिती आहे. ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे ते समजावून सांगू शकतात. पंतप्रधान मोदी देखील त्यापैकी एक आहेत.", असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. आता, भाजपकडून राहुल गांधींच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात जगभरात भारताचं महत्त्व वाढत आहे. मात्र, जगात देशाचं वाढत असलेलं महत्त्व कमी करण्याचं काम राहुल गांधी विदेश दौऱ्यात करत आहेत. यापूर्वीच्या दौऱ्यातूनही त्यांनी हेच केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेश दौरा केला, या दौऱ्यात ते जवळपास २४ देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांना भेटले, तर ५० हून अधिक बैठकांना हजेरी लावली. या दौऱ्यावेळी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, मोदी इज द बॉस, हेच राहुल गांधींच्या पचनी पडत नाही. दोन नेत्यांच्या दौऱ्यात हा फरक असल्याचेही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.  

राहुल गांधींची मोदींवर टीका

"मला वाटतं जर पंतप्रधान मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केलं आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे. जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्हाला कोणाचे ऐकायचे नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कळू शकत नाही" असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाAnurag Thakurअनुराग ठाकुर