शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi in Gujarat: शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 23:02 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले त्यांच्या विरोधात कामे केली जात आहेत. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू,” असे राहुल गांधी म्हणाले.

“गुजरात हे नशेचे केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांचीच परवानगी?,” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.अनेकआश्वासनं“सत्तेत आल्यानंतर काँग्रेस कोरोना महासाथीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देईल. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देऊ. आम्ही इंग्रजी माध्यमाच्या ३००० शाळा उघडू आणि मुलींना मोफत शिक्षण देऊ. सध्या १००० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिले जातील. मला बेरोजगारी संपवायची आहे. गुजरातमधील १० लाख तरुणांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होईल, याची मी खात्री देतो,” असं राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरात