शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : 'जो राहुल गांधी तुमच्या मनात आहे, त्याला मी कधीच मारलंय'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 20:40 IST

Rahul Gandhi : 'मला माझ्या इमेजची अजिबात पर्वा नाही, तुमच्या मनात माझ्याबद्दल जी इमेज आहे, ती तशीच ठेवा.'

Rahul Gandhi : अनेकदा माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत अनेकदा राहुल यांना प्रश्नही विचारण्यात आले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. या भारत जोडो यात्रेदरम्यान  (bharat jodo yatra) त्यांना त्यांची प्रतिमा खराब करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वजण अवाक् झाले. 

या यात्रेने तुमची प्रतिमा किती बदलली आहे? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, 'तुमच्या मनात असलेल्या राहुल गांधीला मी कधीच मारले आहे. तो राहुल आता माझ्या मनात नाही, तो गेलाय. तुम्ही जो माणूस पाहत आहात, तो राहुल गांधी अजिबात नाही. तो फक्त तुम्हालाच दिसतोय. तुमचा विश्वास नसेल तर हिंदू धर्म वाचा, शिवजी वाचा. राहुल गांधी तुमच्या आणि भाजपच्या मनात आहे, पण माझ्या मनात नाही.' असे उत्तर राहुल यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, 'मला माझ्या प्रतिमेची अजिबात पर्वा नाही. तुमच्या मनात माझ्याबद्दल जी प्रतिमा असेल, ती ठेवा. मला फक्त माझं काम करायचं आहे. माझ्या प्रतिमेत किती बदल झाला, हे तुम्हीच ठरवा. मी कोण आहे, काय आहे, हेही तुम्हीच ठरवा. मला याबाबत आता काहीही वाटत नाही, मी माझे काम करतोय आणि पुढेही करत राहीन.'

'सध्या देशात जे काही सुरू आहे, तो राजकीय लढा नसून देश वाचवण्याची लढाई आहे. ही लढाई खरोखर राजकीय लढाई नाही. जेव्हा आपल्याकडे बसपा किंवा टीआरएसविरोधात निवडणुका होतात, तेव्हा ती राजकीय लढत असते. ज्या दिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशातील संस्था ताब्यात घेतल्या, तेव्हापासून हा लढा राजकीय नाही राहिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस