शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी दिली एक व्यक्ती, एका पदाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 10:30 IST

एक व्यक्ती एक पद हे तत्त्व संघटनेतील पदांवर लागू होते. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे

आदेश रावल

नवी दिल्ली : पक्षाच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ हा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आमची ती वचनबद्धता होती. मला आशा आहे की, पक्ष त्यावर ठाम राहील, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी राहुल यांनी हे विधान केले हे विशेष. 

एक व्यक्ती एक पद हे तत्त्व संघटनेतील पदांवर लागू होते. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे, असे गेहलोत यांनी बुधवारी म्हटले होते. आपण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवू,  पण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असे त्यांना सुचवायचे होते. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी गेहलोत पक्षाध्यक्ष बनले तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल, असे म्हटले होते. 

पायलट मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी...दिग्विजय यांच्या या विधानानंतर गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असे मी कधीही म्हणालाे नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जो काही आदेश देतील तो मला मान्य असेल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या पवित्र्यानंतर आपण जर राजीनामा दिला तर सचिन पायलट मुख्यमंत्री होऊ नयेत, असा गेहलोत यांचा प्रयत्न आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी