शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 06:45 IST

Rahul Gandhi Criticize Modi Cabinet: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

 नवी दिल्ली -  तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे राजकीय वारसा असलेल्या घराण्यांतून आलेले आहेत, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले व भाजपच्या घराणेशाहीच्या राजकारणावर प्रहार केले.

त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पिढ्यान्पिढ्या केलेला संघर्ष, सेवा, त्यागाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे लोक आता त्यांच्या ‘सरकारी परिवारातील’ लोकांना सत्तेतील वाटा देत आहेत. बोलायचे एक व करायचे दुसरेच याचे उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस घराणेशाहीच्या राजकारणाचे समर्थन करते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांशी निगडित असलेल्या घराणेशाहीसंदर्भात राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी