नवी दिल्ली - किरकोळ चुका आणि कृतींमुळे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एखदा अडचणीत सापडले आहेत. आज संसदेच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना केलेल्या कृतीमुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.आज राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाषणाकडे लक्ष देण्याऐवजी मोबाइलवर व्यस्त असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 17 व्या लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर आज संसदेच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र आपल्याच विश्वात मग्न असल्याचे कॅमेऱ्याने टिपले. एकीकडे राष्ट्रपती आपल्या भाषणामधून विविध मुद्दे मांडत होते. तर राहुल गांधी मात्र मोबाइलवर काहीतरी टाइप करत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसत आहे. सुमारे एक तास चाललेल्या राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान सुमारे 24 मिनिटे राहुल गांधी मोबाइलवर गुंतलेले दिसत होते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:36 IST