शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेती बचाव यात्रा: हरयाणा सीमेवर नाट्यमय घडामोडी; राहुल गांधी यांना अखेर राज्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:40 IST

पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. त्यांच्यासमवेत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते. 

पिहोवा (कुरुक्षेत्र) : पंजाबला लागून असलेल्या हरयाणाच्या सीमेवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मोजक्या नेत्यांना कृषी कायद्याविरोधी रॅलीसाठी भाजपशासित हरयाणा राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली.पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. त्यांच्यासमवेत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते; परंतु पिहोवा सीमेवरील टेकोर गावानजीक महामार्गावर तासभर शेती बचाव यात्रा रोखण्यात आली.हरयाणातील भाजप सरकारने सोमवारी म्हटले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी काही लोकांसोबत येऊ शकतात; परंतु राज्यातील वातावरण बिघडू शकते म्हणून पंजाबमधून मोठी गर्दी घेऊन आले तर परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही म्हटले होते की, राहुल गांधी यांना आपली भूमिका मांडण्याचा हक्क आहे; परंतु पंजाबमधून मोठ्या संख्येने लोक घेऊन आल्यास परवानगी दिली जाणार नाही.सिरसा येथे आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा...नवीन कृषी कायद्याच्या विरोधात सिरसा येथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या घराभोवती घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याच्या फवाºयासह अश्रुधुराचा मारा केला. मंगळवारी दुपारी निदर्शने करण्यासाठी सिरसामध्ये पोहोचलेल्या शेकडो शेतकºयांनी कठडे तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलक शेतकºयांना तेथून पिटाळून लावण्यासाठी दोनदा पाण्याच्या फवाऱ्यासह अश्रुधुराचा मारा केला.यावेळी झालेल्या धावपळीत काही शेतकरी जखमी झाले. सकाळपासून शेतकरी दसरा मैदानात जमले होते. शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या भाषणानंतर शेतकरी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि वीजमंत्री रणजित सिंह यांच्या घराला घेराव घालण्यासाठी जाणार होते. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी मंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर कठडे लावले होते. दुपारी ३ वाजता तेथे पोहोचलेल्या शेतकºयांनी कडठे तोडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस