शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:30 IST

सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे.

नवी दिल्लीः लडाखजवळ चीन अन् भारत आमनेसामने आल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना हल्लाबोल केला आहे. सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले आहे की, प्रत्येकास सीमेचे वास्तव माहीत आहे, पण तुमच्या मनाच्या आनंदासाठी ‘शाह-यद’ हा विचार चांगला आहे. बिहारमध्ये एका रॅलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते की, भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्त्राईलनंतर संपूर्ण जग सहमत आहे की इतर कोणताही देश आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असेल तर तो भारत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे हे विधान ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी कविता लिहिली. त्या कवितेतून त्यांनी अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सीमा विवाद सुरू आहे. सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आलेले आहेत आणि दोन्ही बाजूंकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बैठकांच्या फे-या झाल्या. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वादासंदर्भात गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. अलीकडेच त्यांनी असा प्रश्न केला होता की, कोणतेही चिनी सैनिक भारतीय हद्दीत शिरले नाहीत, याची खात्री सरकार करू शकेल का?चिनी सैन्य युद्धाच्या तयारीत व्यस्तभारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी मुत्सद्दीपणाचा आणि वाटाघाटीचा मार्ग निवडला असला तरी चिनी सैन्य सतत युद्धाच्या तयारीत व्यस्त आहे. तिबेट सीमेवर युद्धाचा सराव केल्यानंतर आता चिनी सैन्याने देखील चीनच्या वायव्य भागात डोंगरावर लढा देण्यासाठी युद्ध सराव केला आहे. चीनची अधिकृत मीडिया सातत्याने चिनी सैनिकी युद्धाचे व्हिडिओ शेअर करीत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी