शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

थेट भरती हा दलित, आदिवासी, ओबीसींच्या हक्कांवर हल्लाच, राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:02 IST

राहुल गांधी यांनी उबेर कॅबमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, यात ते ड्रायव्हर सुनील उपाध्याय यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेताना दिसतात.

नवी दिल्ली: दलित, ओबीसी, आदिवासी यांचे हक्क हिरावून केंद्र सरकारच्या सेवेत लोकांची मोदी सरकार थेट भरती करत आहे. बहुजनांच्या राखीव जागा भाजपने हिसकावून घेतल्या आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. तर केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी असलेल्या पदांवर रा. स्व. संघाच्या लोकांची थेट भरती केली, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

नोकऱ्यांमध्ये थेट भरती हा दलित, ओबीसी, आदिवासींच्या हक्कांवर थेट हल्ला आहे. भाजप रामराज्याचे नाव घेत हे गैरप्रकार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यावेळी केली. तसेच, राहुल गांधी यांनी उबेर कॅबमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, यात ते ड्रायव्हर सुनील उपाध्याय यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेताना दिसतात. कमी उत्पन्न आणि वाढती महागाई ही भारतातील कामगारांची प्रमुख समस्या आहे. ते केवळ जगत असून, कुटुंबाच्या भविष्यासाठी कोणतीही बचत किंवा कोणताही आधार त्यांच्याकडे नाही, असे राहुल गांधी म्हणाले. 

केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले... केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये यूपीएससीद्वारे होणारी थेट भरतीची पद्धत अयोग्य आहे. आम्ही त्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार आहोत असे लोक जनशक्त्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सेवेतील ४५ पदे थेट भरतीद्वारे भरण्याची यूपीएससीने अधिसूचना जारी केली आहे. त्याविरोधात आवाज उठविणारा लोक जनशक्ती हा एनडीएतील पहिला घटक पक्ष आहे. सरकारी पदे भरताना राखीव जागांचे तत्व पाळण्यात आलेच पाहिजे असेही पासवान यांनी म्हटले आहे.

कंत्राटी भरतीत ९१ टक्क्यांनी वाढ' मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सरकारी खात्यांमधील पदे भरण्यापेक्षा भाजपच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत सार्वजनिक उपक्रमांतील आपल्या हिश्शाची विक्री केली. याद्वारे सरकारी सेवांतील ५.१ लाख पदे रद्द केली. या कालावधीत कंत्राटी तत्त्वावर होणाऱ्या भरतीत ९१ टक्क्यांनी वाढ झाली. २०२२-२३ या कालावधीत सरकारी नोकऱ्यांतील एससी, एसटी, ओबीसी यांच्या पदांची संख्या १ लाख ३० हजारांनी कमी झाली. केंद्र सरकारच्या काही खात्यांमध्ये विशिष्ट पदांवर खासगी क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतील तज्ज्ञांची थेट भरती करण्याचे धोरण तत्कालीन काँग्रेस सरकारने अंमलात आणले होते. मात्र मोदी सरकारने दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांच्या हक्कांवर गदा आणून थेट भरती करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस