शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:13 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.गुजरात हा भाजपाचा बालेकिल्लाच आहे. तेथे आम्ही एवढ्या जागा केवळ राहुल गांधी यांच्यामुळे मिळवू शकलो. यंदा आमची कामगिरी चमकदारच आहे, असे कमलनाथ म्हणाले. काँग्रेसची कामगिरी प्रभावीच राहिली, आमचे बळ वाढले. राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली मिळालेला विजय हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे, असे रेणुका चौधरी म्हणाल्या.मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. राहुल गांधी यांच्या प्रभावी प्रचारामुळे काँग्रेसची कामगिरी सरस राहिली. आम्हाला अपेक्षित मुक्काम गाठता आला नाही; परंतु एकूण आमचा हा प्रवास चांगलाच झाला, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.हा नैतिक विजय - गेहलोतराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत करण्यात आलेल्या प्रचाराचे हे यश असून, हा काँग्रेसचा नैतिक विजय होय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी टिष्ट्वटवर दिली आहे.‘ईव्हीएम’मुळे भाजपाविजयी - संजय निरुपमगुजरातमधील भाजपाच्या विजयामागे जनता नव्हे तर ईव्हीएम आहे, असा स्पष्ट आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. भारतीय लोकशाहीला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा मोठा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण गुजरात भाजपाच्या विरोधात होता. पंतप्रधानांच्या प्रचारसभेत खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या, तरीही गुजरातमध्ये भाजपा विजयी झाले. या विजयामागे जनमत नव्हे तर ईव्हीएम आहे, असे त्यांनी टिष्ट्वटवर म्हटले आहे.भाजपाचा आता विजय, पण २०१९ ची लोकसभा सोपी नाही-गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपाची कामगिरी अपेक्षेपेक्षाही खाली घसरल्याचे लक्षात घेता, २०१९ मधील लोकसभा निवडणूक भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सहजसोपी नाही, असे तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) वरिष्ठ नेत्याने सोमवारी म्हटले आहे.टीआरएसचे लोकसभेतील सभागृह नेते ए.पी. जितेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, भाजपाने मूलत: आपले प्रशासन तपासून घेतले पाहिजे. गुजरातेतील निवडणूक निकालाने भाजपाला चार पावले मागे जावे लागल्याचे मत रेड्डी यांनी व्यक्त केले.काँग्रेसचा दिमाखदार विजयकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हार्दिक अभिनंदन. गुजरातमधील दिमाखदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे मोठे यश होय. भाजपाला जेमतेम गुजरातेत सत्ता राखता आली. तथापि, लवकर गुजरातच्या जनतेच्या पदरी निराशा येईल. यादव यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू गटाने काँग्रेससोबत युती करून चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा या गटाने जिंकल्या आहेत. इतर राज्यांप्रमाणे गुजराती जनताही निराश होईल.- शरद यादव, जेडीयूचे बंडखोर नेतेभाजपाला पर्याय नाहीगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन. देशात भाजपाला पर्यायच नाही. मोदी आणि शहा यांच्या संघटन कौशल्याचा हा विजय आहे.- वसुंधरा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्रीजनतेने स्वीकारले राहुलचे नेतृत्वगुजरात विधानसभा निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचा दावा करणाºया भाजपाला जेमतेम सत्तेचा सोपान राखता आला. गुजरातच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांचे नेतृत्वही स्वीकारले आहे.- सचिन पायलट, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस