शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राहुल अमेठीत; भाजपला लक्ष्य करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 04:45 IST

कैलास मानसरोवराची यात्रा पूर्ण करून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘शिवभक्त’ म्हणून गौरविल्यानंतर ते सोमवारी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गेले

अमेठी - कैलास मानसरोवराची यात्रा पूर्ण करून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘शिवभक्त’ म्हणून गौरविल्यानंतर ते सोमवारी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गेले असता ‘बम बम भोले’च्या घोषात कनवारिया संघाने त्यांचे स्वागत केले. या मतदारसंघाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘शिवभक्त राहुल गांधी’ असे मोठमोठाले फलक लावण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांत हिंदू मतदारांना आकृष्ट करण्यासाठी काँग्रेसने ही नवी रणनीती तयार केल्याचे सांगण्यात आले.अमेठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी सांगितले की, मानसरोवर यात्रा हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानण्यात आली आहे. या यात्रेहून परतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीच्या दौºयावर आले असून, त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्याचा आमचा मनसुबा होता आणि ते आम्ही करून दाखवले.मंगळवारी प्रभातफेरीमध्ये राहुल गांधी सहभागी होतील. काँग्रेस कार्यकर्ते २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत या मतदारसंघातील गावागावांमध्ये प्रभातफेरी काढतील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात एप्रिलमध्ये राहुल गांधी प्रवास करीत असलेले विमान अचानक हवेत हेलकावे खात शेकडो फूट खाली आले होते. या संकटातून बचावल्यानंतर त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचा संकल्प सोडला होता.इराणींना देणार प्रत्युत्तर?या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीचा दौरा केला होता. या मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. त्याला राहुल नेमके काय उत्तर देतात, याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnewsबातम्या