शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमध्ये मंत्र्यांपेक्षा नोकरशहांना जास्त अधिकार- राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 10:20 IST

नोकरशहांकडून सुधारणांमध्ये खोडा घालण्याचं काम- रघुराम राजन

दावोस: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील नोकरशाहांवर कडाडून टीका केली आहे. आर्थिक सुधारणा अपयशी ठरण्यात नोकरशहांचा फार मोठा हात आहे, अशा शब्दांमध्ये राजन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बरसले. नोकरशहांमुळे आर्थिक सुधारणांचा गाडा पुढे जाण्यात अडथळे येतात, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना फार अधिकार नाहीत. त्या तुलनेत नोकरशहांच्या हातात जास्त अधिकार असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. राजन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दावोसमध्ये मुलाखत दिली. दावोसमध्ये सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू आहे. सरकारी बँकांच्या खासगीकरणाबद्दल राजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी नोकरशाह आणि त्यांची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली. 'सरकारी बँकांमधील हस्तक्षेप थांबायला हवा. कोणत्याही नोकरशहापेक्षा एखाद्या पात्र व्यक्तीकडे बँकांचं नेतृत्त्व सोपवायला हवं. बँक चालवण्यासाठी नोकरशहा पर्याय असू शकत नाही. बँकांची धुरा योग्य व्यक्तींकडेच द्यायला हवी,' असं परखड मत राजन यांनी व्यक्त केलं. राजन यांनी रिझर्व्ह बँकेतील त्यांचा अनुभवदेखील यावेळी सांगितला. 'गव्हर्नर म्हणून काम करताना अनेक प्रकारचे नोकरशहा भेटले. त्यामुळे वेगवेगळे अनुभव आले. या काळात काही चांगले अनेक अधिकारी भेटले. तर अनेक अधिकारी असेही होते, ज्यांना सुधारणांसाठी केलेले प्रयत्न समस्या वाटायचे,' असा अनुभव राजन यांनी बोलून दाखवला. सध्याच्या देशात मंत्र्यांची भूमिका नोकरशहा पार पाडत आहेत. खरंतर मंत्र्यांनी नोकरशहांना आदेश द्यायला हवेत. मात्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्यांऐवजी नोकशहा सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी