शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राफेल विमानांमुळे भारताची सामरिक क्षमता वाढेल, हवाई दलाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:00 IST

राफेल विमान करारावरून देशातील वातावरण तापले असतानाच भारतीय हवाई दलाने मात्र हा करार अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून देशातील वातावरण तापले असतानाच भारतीय हवाई दलाने मात्र हा करार अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. राफेलची विमाने दर्जेदार असून, या विमानांमुळे भारताच्या सामरिक क्षमतेत अभूतपूर्व वाढ होणार असल्याचा दावा हवाई दलाने केला आहे. राफेल विमान करारावर टीका करत असलेल्यांनी या विमानांच्या खरेदीसाठी ठरवण्यात मापदंड आणि खरेदी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, असे हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एस.बी. देव यांनी सांगितले. 58 हजार कोटी रुपयांच्या राफेल करारावरून सध्या विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. एअर मार्शल एस. बी. देव म्हणाले, हे एक चांगले विमान आहे. त्याची क्षमता उच्च दर्जाची आहे आणि या विमानाचे उड्डाण करण्याची आम्ही वाट पाहत आहोत . या विमानांमुळे आणीबाणीच्या परिस्थितीत आव्हानाचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ होईल, सामरिक क्षमतेत  एका कार्यक्रमामध्ये राफेल विमान कराराबाबत विचारणा करण्यात आली असता देव यांनी ही माहिती दिली. राफेल विमान खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला होता. 2016 साली या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. या करारांतर्गत भारत फ्रान्सकडून 58 हजार कोटी रुपयांमध्ये 36 विमाने खरेदी करणार आहे. मात्र विमानांच्या किमतीमुळे हा करार वादात सापडला आहे.  दरम्यान, राजकारणात गाजणारा राफेल विमान कराराचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. राफेल करार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. राफेल डीलमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करत वरिष्ठ वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राफेल विमानांच्या खरेदीचा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्यानं राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. राफेल कराराबद्दल मोदी देशाशी खोटं बोलले, असा घणाघाती आरोप राहुल यांनी लोकसभेत केला होता. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलPoliticsराजकारण