शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

राफेल करार होण्यापूर्वी अनिल अंबानींनी घेतली होती फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 10:03 IST

सध्या गाजत असलेल्या राफेल विमान खरेदी कराराबाबत रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत.

ठळक मुद्देराफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते2015 साली मार्च महिन्यातील चौथ्या आठवड्यामध्ये ही भेट झाली होतीया बैठकीमध्ये फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जीन वेस ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जीन क्लॉड मेलेट हे सुद्धा सहभागी झाले होते

नवी दिल्ली - सध्या गाजत असलेल्या राफेल विमान खरेदी कराराबाबत रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, राफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असा गौप्यस्फोट झाल्याने हा वाद अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. राफेल विमान करारामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला मिळालेल्या प्राधान्यावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्याचदरम्यान आज इंडियन एक्स्प्रेसने एक वृत्त प्रकाशित करून हा करार होण्यापूर्वी पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असा गौप्यस्फोट केला आहे. 2015 साली मार्च महिन्यातील चौथ्या आठवड्यामध्ये ही भेट झाली होती. त्यावेळी अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच या बैठकीमध्ये फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जीन वेस ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जीन क्लॉड मेलेट हे सुद्धा सहभागी झाले होते.  राफेल विमान कराराबाबतचा कॅगचा अहवाल आज संसदेसमोर सादर होणार आहे. या अहवालामध्ये राफेल विमानांच्या किमतीबाबत काय माहिती नमूद करण्यात आली आहे. याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान,  भारतीय हवाईदलासाठी दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा ७.८७ युरो खर्चाचा करार फ्रेंच सरकारशी करण्याच्या काही दिवस आधी मोदी सरकारने अशा प्रकारच्या करारांमध्ये एरवी नियमितपणे समाविष्ट केली जाणारी एकूण आठ कलमे मोदी सरकारने ऐनवेळी वगळली, असा दावा ‘दि हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने सोमवारी केला.या व्यवहारासंबंधीच्या सरकारी फायलींमधून उपलब्ध झालेल्या नव्या माहितीवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचे वृत्त या दैनिकाने प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या अधिकृत वाटाघाटी समितीच्या चर्चा अपूर्ण असतानाच पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे फिरू लागल्यानंतर प्रस्तावित करारात करायचे हे बदल घाईघाईने मंजूर केले गेले. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलAnil Ambaniअनिल अंबानीFranceफ्रान्सIndiaभारत