शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Rafale Deal Contoversy: पवारांनी मोदींना क्लीन चिट दिली नाही; राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 08:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच शरद पवारांनीराफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली नसल्याचंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे.विशेष म्हणजे काल पवारांनी मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं सांगितल होतं आणि आता पक्षानं ही वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं लढाऊ विमानं असलेल्या राफेलच्या खरेदी किमतीबाबत खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच मीडियानं पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याचंही नवाब मलिक म्हणाले आहेत.तत्पूर्वी शरद पवार एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले होते, राफेलवरून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र मुळात या कराराबाबत योग्य ती माहिती समजावून घेणं आवश्यक आहे. देशाला राफेल विमानांची गरज आहे, राफेल विमान उत्तम आहेत. तरीही विरोधक संसदीय समिती स्थापनेची मागणी करत असतील, तर सरकारने समिती स्थापन करून याची चौकशी करावी. विमानाच्या तांत्रिक बाजू जाहीर केल्यास तो देशाच्या सुरक्षेला धोका ठरेल. त्यामुळे शत्रूराष्ट्राला विमानाच्या तीव्रतेची जाणीव होईल. या प्रकरणावर सामान्य नागरिकांच्या मनामध्ये मोदींच्या हेतूविषयी शंका नाही, असं म्हणत पवारांनी मोदींची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण केली होती.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी