शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: नरेंद्र मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात टाकाः राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 12:37 IST

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला.

ठळक मुद्देराफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे राफेल कराराबाबत भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री, एचएएल, परराष्ट्र मंत्री यापैकी कुणालाही माहिती नव्हती

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यासाठी त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. 

राफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित करून राफेल काराराबाबत नवा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.  आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, राफेल करारप्रकरणी एक ईमेल समोर आला आहे. एअरबस कंपनीचे एक्झिक्युटिव्ह यांच्याशी संबंधित असलेल्या या ईमेलमध्ये फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अनिल अंबानी गेले होते, असा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आल्यानंतर एक करार होईल, यात अनिल अंबानी यांचे नाव असेल, असे अनिल अंबानी यांनी या बैठकीत सांगितले होते.'' ''या राफेल कराराबाबत भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री, एचएएल, परराष्ट्र मंत्री यापैकी कुणालाही माहिती नव्हती. मात्र अनिल अंबानी यांना दहा दिवस आधीच यासंदर्भातील माहिती होती. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींसाठी मध्यस्थाचे काम करत होते, असा होतो. या आधारावर गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खटला दाखल केला गेला पाहिजे. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. कारण हा देशद्रोहाचा मामला आहे.'असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

 

''राफेल करारामध्ये भ्रष्टाचार, प्रक्रिया आणि देशद्रोह या तीन बाबतीत गुन्हा घडला आहे. त्यातून कुणीही सुटणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच तसेच कॅगच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  कॅगच अहवाल हा निरर्थक आहे. म्हणजे चौकीदार ऑडिटर जनरल रिपोर्ट आहे. तो नरेंद्र मोदींचा अहवाल आहे. थोडक्यात सांगायचं तर चौकीदाराने, चौकीदाराच्यावतीने, चौकीदारासाठी तयार केलेला अहवाल म्हणजे कॅगचा अहवाल होय,''अशी टीका राहुल गांदी यांनी केली.  

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानी