शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal : 'राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी, म्हणूनच FIR झाला नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:02 IST

Rafale Deal : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देराफेल करारासंदर्भातील विश्वजीत राणे यांची कथित ऑडिओ क्लिपविश्वजीत राणेंची ऑडिओ क्लिप खरीच, म्हणून अद्याप चौकशी झाली नाही - राहुल गांधीराफेल करारावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोवा सरकारमधील मंत्री विश्वजीत राणे यांची राफेल करारासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप महिन्याभरापूर्वी काँग्रेसनं ट्विटवर पोस्ट केली होती. 

यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोमवारी(28 जानेवारी) रिट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ''विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप खरी असून मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल करारासंदर्भातील सर्व गोपनीय माहिती आहे. ही ऑडिओ क्लिप समोर येऊन 30 दिवस झालेत. मात्र याविरोधात अद्यापपर्यंत FIR ही नोंदवली गेली नाही किंवा चौकशीदेखील करण्यात आली नाही.

नेमके काय आहे प्रकरण?

राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर 2 जानेवारी रोजी 'ऑडिओ बॉम्ब' टाकला होता. राफेल डीलसंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसकडून जारीकरण्यात आली होती. या क्लिपमुळे राफेल डील प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले.  गोव्याच्या कॅबिनेटमध्ये राफेल खरेदी करारासंदर्भात झालेल्या चर्चेचा हवाला देत काँग्रेसनं गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहीत मोदी सरकारवर निशाणा साधला. कथित ऑडिओ क्लिपमध्ये राणेंनी म्हटलं की,''राफेलसंदर्भातील सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहेत. त्यामुळे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, असे मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.'' 

यावरुनच काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवरही पुन्हा निशाणा साधला. पर्रीकरांकडे राफेलची सर्व रहस्यं असल्यानंच मोदी त्यांना घाबरत आहेत का? , असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला. तसंच राफेलच्या सर्व फाईल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये कशा आल्या आणि का आहेत?, अशी विचारणादेखील काँग्रेसनं केली.

विश्वजित राणेंचं स्पष्टीकरणदरम्यान, काँग्रेसनं जारी केलेली ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ''क्लिपमधील संभाषण काँग्रेसकडून चुकीच्या पद्धतीनं समोर आणण्यात आले आहे. या क्लिपची लॅबटेस्ट करावी'',अशी मागणीही राणे यांनी केली होती. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला. शिवाय, काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये, जेणेकरुन कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तसंच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राफेल डील किंवा यासंदर्भातील कागदपत्रांबाबत कधीही कोणतेही विधान केले नव्हते, असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManohar Parrikarमनोहर पर्रीकरNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील