शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

Rafale Deal Scam: राफेल विमान करार हा सरकारचा धाडसी निर्णय, हवाई दलप्रमुखांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 15:10 IST

Rafale Deal Scam: राफेल विमाने आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणाली भारतीय सुरक्षा व्यवस्थे बुस्टर डोस ठरणार असल्याचे मत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मांडले आहे.

नवी दिल्ली - राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेला करार हा सरकारने घेतलेला धाडसी निर्णय असून, राफेल विमाने आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणाली भारतीय सुरक्षा व्यवस्थे बुस्टर डोस ठरणार असल्याचे मत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मांडले आहे. एकीकडे राफेल विमानांवरून देशात राजकीय वाद पेटला असतानाच हवाई दलप्रमुखांनी फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशनसोबत झालेल्या कराराला योग्य ठरवले आहे. राफेल करारामधून आम्हाला अनेक फायदे मिळणार असल्याचे हवाई दलप्रमुखांनी म्हटले आहे. 

 राफेल विमान करार योग्य असल्याचे सांगताना हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ म्हणाले की, " आमच्यासमोर कठीण परिस्थिती होती. त्या परिस्थिती आमच्यासमोर काही तरी घडण्याची वाट पाहणे. आरपीएफला विड्रॉ करणे किंवा आपातकालीन खरेदी करणे, असे तीन पर्याय होते. अखेर आम्ही विमान खरेदीचा निर्णय घेतला." राफेल एक उत्तम प्रतीचे विमान असून, ते जेव्हा उपखंडात येईल, तेव्हा ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे." राफेल विमान खरेदीचा करार हा सरकारने घेतलेला एक अत्यंत धाडसी निर्णय असल्याचेही ते म्हणाले. 

यावेळी हवाई दलाती घटत असलेल्या स्क्वॉड्रनच्या संख्येबाबतही हवाई दलप्रमुखांनी चिंता व्यक्त केली. तसेच हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससोबत करार करूनही डिलिव्हरीमध्ये होत असलेल्या उशिरावर बोट ठेवले. "सुखोई विमानांच्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षे उशीर झाला. जग्वार या लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीसाठी सहा वर्षे उशीर झालाय. एलसीएच्या डिलिव्हरीसाठी पाच वर्षे आणि मिराज 2000च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षे उशीर झाला आहे," अशी माहिती हवाई दलप्रमुखांनी दिली.   

राफेल विमानांचे कौतुक करतानाच धनोआ यांनी भारतीय कंपनीच्या निवडीबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. "फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशनला आपल्या ऑफसेट भागीदाराची निवड करायची होती. त्यामध्ये सरकार आणि भारतीय हवाई दलाची कोणतीही भूमिका नव्हती." अशी माहिती धनोआ यांनी दिली. एकीकडे सरकारनेच रिलायन्सला भागीदारी मिळवून देण्यासाठी सरकारने दबाव बनवल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असतानाच हवाई दलप्रमुखांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.  

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलB S Dhanoaबी एस धानोआ