शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

राफेलचा गुंता सुटेल

By admin | Updated: February 20, 2015 01:57 IST

फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे.

बंगळुरू : फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. या लढाऊ विमानांच्या किमतीत कोणताही बदल केला नसून, विनंती प्रस्तावातील अटींवर आम्ही कायम असल्याचे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रेपियर यांनी गुरुवारी सांगितले. येथील एअरो शो-२०१५ मध्ये ते बोलत होते.दरम्यान, भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता. (वृत्तसंस्था)मेक इन इंडियाला रशियाचे समर्थनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिल्याबद्दल रोस्टेक या रशियन सरकारी कंपनीने जोरदार समर्थन केले आहे. नागरी आणि संरक्षण क्षेत्रात विकास, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे काम ही कंपनी करते. भारताने अमेरिकेकडून उत्पादने खरेदी केल्यामुळे आमचे भारतासोबतचे संबंध बिघडणार नाहीत. आम्ही कोणत्याही देशाला अन्य देशांची उत्पादने खरेदी करण्याला अटकाव घालत नाही. अमेरिकेचे मात्र तसे नाही, असे या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.—————————————-सुखोई आता ब्रह्मोसने सुसज्ज ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गती असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडलेले एकात्म सुखोई- ३० लढाऊ विमान एचएएल या भारतीय कंपनीने गुरुवारी वायुदलाच्या सुपूर्द केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडल्यामुळे हे विमान अतिशय घातक शस्त्रांनी सुसज्ज झाले असल्याचे एचएएलचे अध्यक्ष टी सुवर्णा राजू यांनी स्पष्ट केले. या कंपनीच्या अंतर्गत डिझाईन चमूने ब्रह्मोसच्या एकत्रीकरणाचे काम चोखपणे पार पाडले. येथे हवाईदलाच्या येलहंका तळावर एअरो शोच्या वेळी ते वायुदलाच्या सुपूर्द करण्यात आले.