राफेल सौद्याचा गुंता लवकरच सुटेल डेसॉल्टला आशा : विमानांच्या किमतीत बदल नाही
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
बंगळुरू : फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. या लढाऊ विमानांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नसून, विनंती प्रस्तावातील अटींवर आम्ही कायम असल्याचे या कंपनीच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
राफेल सौद्याचा गुंता लवकरच सुटेल डेसॉल्टला आशा : विमानांच्या किमतीत बदल नाही
बंगळुरू : फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. या लढाऊ विमानांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नसून, विनंती प्रस्तावातील अटींवर आम्ही कायम असल्याचे या कंपनीच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.याबाबत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांनी डिसेंबरमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार या कंपनीची उच्चाधिकार चमू भारतात पोहोचली असून, ती चर्चा पुढे सुरू ठेवणार आहे. किमतीचा मुद्दा अगदी स्पष्ट असून, निविदेनुसार कमीत कमी बोली लावतानाच (एलआय) आम्ही पहिल्या दिवसापासून किंमत कायम ठेवली आहे. किमतीच्या आघाडीवर कोणताही बदल केलेला नसेल, असे डेसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रेपियर यांनी सांगितले. भारताच्या एचएएल या सरकारी कंपनीद्वारे १०८ लढाऊ विमानांची निर्मिती केली जाणार असून, त्याला हमी देण्यास डेसॉल्ट इच्छुक नसल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. आम्ही विनंती प्रस्तावातील (आरएफपी) उत्तरावर ठाम आहोत. त्यामुळेच भारताने राफेलची निवड केली असल्याचे त्यांनी नमूद केले. ते येथे एअरो इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आले आहेत. -------------------------इजिप्तसोबत महागडा करारभारताला विक्री होणार्या १२६ राफेल विमानांसाठी आकारण्यात आलेली १० अब्ज डॉलरची किंमत पाहता डेसॉल्टने याच आठवड्यात इजिप्तला २४ राफेल विमाने पुरविण्यासाठी केलेला ५.९ अब्ज डॉलरचा सौदा हा कितीतरी पट जास्त किमतीचा आहे. यापूर्वी हमी शर्ती आणि किमतीतील वाढीमुळे फ्रान्ससोबतच्या करारात अडचणी येत असल्याचा दावा भारतीय संरक्षण दलाच्या सूत्रांनी केला होता. आरपीएफचे पालन केले तर हा सौदा लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो. मात्र, चेंडू फ्रान्सच्या कोर्टात आहे, असेही सूत्रांनी म्हटले होते.इजिप्तसोबत २४ विमाने, युद्धनौका आणि युद्धसामग्रीबाबत करार झाल्याबद्दल कोणत्या बातम्या प्रसिद्ध झाल्या याचा विचार केला जाऊ नये. त्यात केवळ विमाने नाहीत. २०१२ मध्ये डेसॉल्टची पहिल्यांदा निवड केली तेव्हा या कंपनीकडून आयात करणारा भारत हा पहिला देश बनला होता. प्रत्येक देशाची चर्चेची पद्धत वेगवेगळी असते. इजिप्तच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याची आमची क्षमता आहे. आम्ही दीर्घकाळपासून भारताचे वायुदल आणि सरकाशी कटिबद्ध आहोत, असेही नेपियर यांनी स्पष्ट केले.