शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

आठवणींतला रेडिओ! रेडिओ दिन जगभरात केला जातो साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:58 PM

13 फेब्रुवारी हा जगभर रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. तो कसा साजरा करतात, कोणास ठाऊक, पण त्या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील अनेक आठवणी मात्र जाग्या होतात. त्या काळात टीव्ही नावाचा प्रकार नव्हताच.

13 फेब्रुवारी हा जगभर रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. तो कसा साजरा करतात, कोणास ठाऊ क, पण त्या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील अनेक आठवणी मात्र जाग्या होतात. त्या काळात टीव्ही नावाचा प्रकार नव्हताच. नाही म्हणायला भारतात टीव्ही आला १९५९ साली. पण तो कोणाकडे नसायचा आणि त्यावर काही कार्यक्रमही नसायचे. लोकांच्या दृष्टीने माहिती मिळवण्याचं, करमणुकीचं एकमेव साधन होतं, ते म्हणजे रेडिओ.आकाशवाणीची केंद्रंही फारशी नव्हती. त्यामुळे दिल्ली मुंबई व पुणे केंद्रावरल्या बातम्या ऐकल्या जायच्या. कुसुम रानडे, ललिता नेने, शरद चव्हाण, दत्ता कुलकर्णी, अनुराधा देशमुख, प्रकाश पायगुडे, माधुरी लिमये असे काही जण बातम्या वाचायचे.आपली आवड, कामगार सभा, प्रपंच, गंमत जंमत, युववाणी, वनिता मंडळ, आपले माजघर, माझं गाव-माझं शिवार, शेतीचे बाजारभाव हे कार्यक्रम ऐकले जायचे. कोकणीतून विश्वंभर उजगांवकर बातम्या सांगायचे. त्यानंतर आकाबायल्या चौकेर कार्यक्रम असायचा. हिंदीत हवा महल, फौजी भाईयों के लिये, संगीत सरिता, भुले बिसरे गीत या कार्यक्रमांमुळे देशातल्या लोकांना झुमरीतलय्या या गावाचं नाव माहीत झालं.गाण्यांची सर्वाधिक फर्माइश तेथूनच यायची. फिल्मी मुकद्दमा, गीत गुंजन, क्रिकेट वुइथ बिजय मर्चंट तसंच क्रिकेटच्या सामन्यांचं धावतं वर्णन कार्यक्रम हमखास ऐकले जायचे. कमर्शिअल ब्रॉडकास्टिंग म्हणजे प्रायोजित कार्यक्रम व जाहिराती हे आॅल इंडिया रेडिओवर खूप उशिरा सुरू झालं. अगरबत्ती व एका साबणाच्या जाहिराती हिंदीत सुरुवातीला आल्या.सिलोनरेडिओवरील अमित सयानी यांचा बिनाका गीतमाला जवळपास प्रत्येक घरात ऐकला जायचा. बिनाका टूथपेस्टही बंद पडली आता. रेडिओ सिलोन पटकन मिळायचं नाही. ते मिळावं, यासाठी कार्यक्रमाच्या दहा मिनिटं खटपट सुरू व्हायची. काही जणांचे रेडिओ खूप चांगले असायचे. त्यावर बीबीसी व व्हॉइस आॅफ अमेरिका ही स्टेशन्सही मिळायची. अशांचा हेवा वाटायचा.ही खासगी कंपनी तीन वर्षांत बंद पडली. आता रेडिओवरील कार्यक्रम शहरांपेक्षा ग्रामीण भागांत हमखास ऐकले जातात. देशातील99%भागांत पोहोचलेलं हे करमणूक व प्रसाराचं एकमेव साधन आहे.तेव्हाचे रेडिओ म्हणे मोठे डबेच असायचे. अनेक बँड असलेले. कार्यक्रमानुसार बँड बदलायचा. काही जणांकडे छोटे ट्रान्झिस्टर. ते बॅटरीवर चालायचे. वीज गेली तरी ते सुरूच. ट्रान्झिस्टरला इबबिल्ट अँटेना असायचा. रेडिओ असेल, तर एरियल बाहेर लावावी लागायची. शिवाय रेडिओचं लायसन्स असायचं. दरवर्षी पोस्टात जाऊ न पैसे भरून ते रीन्यू करावं लागायचं. त्यासाठी रांगा लागायच्या. लायसन्सशिवाय रेडिओ बाळगणं गुन्हाच होता. आता मोठ्या आकाराचे रेडिओ गेलेच. छोटे स्लीक ट्रान्झिस्टर आलेत. त्याला ट्यूनर म्हणतात. असंख्य एफएम स्टेशन्स आहेत. अगदी आॅल इंडिया रेडिओचीही. आॅल इंडिया रेडिओची स्थापना झाली १९३0 साली. पण त्याआधी २३ जुलै १९२७ रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीला मुंबईसाठी व नंतर कोलकात्यासाठी परवानगी देण्यात आली.मुंबईतील पहिलं रेडिओचं प्रक्षेपण कुलाब्याच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लबमधून झालं. त्यामुळे तो रेडिओ क्लब म्हणून आजही ओळखला जातो.