शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

RAC प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:17 IST

रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना एक सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतात दररोज अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. यामध्ये तिकीट आरक्षित करुन प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. तर अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही प्रवाशांचे तिकीट वेटींगवर असते तर काहींना आरएसी (Reservation Against Cancellation) तिकीट मिळते. 

अशातच आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना एक सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेंट आणि उशी दिली जात नव्हती. आता ही सुविधा आरएसी धारकांना मिळणार आहे. 

आरएसी तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जात होते. परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे आता या प्रवाशांना सुद्धा कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे. 

यासंदर्भात बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरएसी तिकीट धारकांना कन्फर्म तिकीट धारकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे. प्रवासी बर्थवर पोहोचताच कोच अटेंडंट बेडरोल पुरवेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि समाधानासाठी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

आता या सुविधा मिळणार!- आता आरएसी तिकीटावर प्रवास करणाऱ्या दोन्ही प्रवाशांना वेगवेगळे बेड रोल, ब्लॅकेट, उशी दिली जाईल. त्यामुळे भेदभावचा आरोप संपणार आहे.- एसी कोचमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी पॅकेटमध्ये असणारे सर्व सामान मिळणार आहे. त्यात बेडशीट, पिलो, ब्लॅकेटचा समावेश आहे.- आरएसी तिकीट आणि कन्फर्म तिकीट धारकांमध्ये कोणताही भेदभाव असणार नाही. सर्व भेदभाव संपणार आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी