शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान विधानसभेतील आठवडाभराचा पेच सुटला; माफीनंतर काँग्रेसच्या ६ आमदारांचे निलंबन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:18 IST

जयपूर : राजस्थान विधानसभेत आठवडाभर सुरू असलेला पेच गुरुवारी सुटला आणि सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यानंतर काँग्रेसच्या सहा ...

जयपूर : राजस्थान विधानसभेत आठवडाभर सुरू असलेला पेच गुरुवारी सुटला आणि सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांचे निलंबनही रद्द करण्यात आले.

मंत्री अविनाश गहलोत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानावरून ठप्प झालेले कामकाज मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा सुरू झाले. शर्मा यांनी विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी आणि विरोधी पक्षनेते टीकाराम जुली यांची बैठक घेतली व चर्चा केली. संपूर्ण समाधान झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात प्रवेश केला, तसेच कामकाजात सहभाग नोंदवला.

ठप्प झालेले कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. काँग्रेस आ. गोविंद सिंह डोटासरा यांनी अध्यक्षांबाबत वापरलेल्या शब्दांबाबत त्यांच्यावतीने माफीही मागितली. यानंतर डोटासरा यांच्यासह सहा आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले.  मुख्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकारचा प्रसंग आलाच तर कामकाज फार काळ ठप्प होता कामा नये.

कामकाज ठप्प झाल्यानंतर काँग्रेसचे मॉक +सेशन तत्पूर्वी, मंत्री अविनाश गेहलोत तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी केलेल्या वक्तव्यांवरून सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. विधानसभेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे काँग्रेसने गुरुवारी सभागृहाबाहेर मॉक सेशन घेतले. फलक घेतलेल्या काँग्रेस सदस्यांनी सभागृहाकडे मार्च काढला व सभागृहाच्या परिसरात घोषणा दिल्या. आपल्या वक्तव्याबाबत मंत्र्यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. मॉक सेशनमध्ये घनश्याम यांनी अध्यक्षांची भूमिका बजावली व इतर सदस्यांनी त्यांना भाजप सदस्यांच्या वर्तणुकीबाबत प्रश्न विचारले. तर सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले व कामकाज लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थान