शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आर. के. सिंहाचा गौप्यस्फोट देशाहिताला मारक

By admin | Updated: August 26, 2015 10:23 IST

इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) गुप्त कारवायांना माजी गृह सचिव आर. के. सिंह यांनी प्रसार माध्यमांत उघड केल्याबद्दल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी त्यांच्यावर

- डिप्पी वांकाणी,  मुंबईइंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) गुप्त कारवायांना माजी गृह सचिव आर. के. सिंह यांनी प्रसार माध्यमांत उघड केल्याबद्दल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सिंह यांनी जे काही सांगितले ते ‘मुर्खपणा’ अशा शब्दांत रिबेरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशा गोष्टींची वाच्यता करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या स्थानाशी तडजोड करण्यासारखेच आहे. कारण भारतात कोणाचे तरी खून करण्याचे कट रचले जातात असा ठपका पाकिस्तान त्यांच्यावर ठेवेल. रिबेरो म्हणाले, ‘‘पाकिस्तान भारतात ज्या गुप्त कारवाया अमलात आणतो त्यांच्याशी संबंधित महत्वाचा तपशील प्रसार माध्यमांना देण्याची चूक त्याने कधीही केलेली नाही. ’’आर. के. सिंह हे भाजपामध्ये दाखल झाले असून त्यांच्या त्या विधानाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे ते असे की दाऊदला पकडण्यासाठी भाजपा सरकार किती गंभीरपणे प्रयत्न करीत आहे हे दाखविण्याचा. भारताविरुद्ध घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय दाऊदचा वापर करीत असून अनेक हल्लेही भारतात तिने घडविले आहेत. परंतु पाकिस्तानच्या कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने कधी या कारवायांची वाच्यता अशा स्वरुपाने केली आहे?, असा प्रश्न रिबेरो यांनी विचारला. सिंह यांनी ते केले कारण ते भाजपामध्ये दाखल झाले असून भाजपा दाऊदबद्दल गंभीर असल्याचे त्यांना ऊर बडवून सांगायचे आहे, असे रिबेरो यांनी म्हटले.दाऊदला संपविण्यासाठी छोटा राजनच्या माणसांना आयबीकडून प्रशिक्षण देण्यात आले होते परंतु मुंबई पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या माणसांना अटक केल्यामुळे ती योजना फसली या सध्या होत असलेल्या आरोपाबद्दल विचारले असता ज्युलिओ रिबेरो म्हणाले की, अशा कारवाईची माहिती मुंबई पोलिसांना कशी होईल? आयबीच्या योजना या गुप्त असतात व खूप नाजूक विषयावरील कारवायांची माहिती ते स्थानिक पोलिसांना देत नाहीत. परंतु शक्यता अशी आहे की स्वत: दाऊदकडूनच ही माहिती येथील अधिकाऱ्याला दिली गेली असावी. अर्थात हा अधिकारी दाऊदला मदत करणारा असेल किंवा नसेलही (गुन्हेगारी टोळ््यांशी संबंध असल्याबद्दल ज्या पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात आले होते त्याचे नाव रिबेरो यांनी सांगितले).दाऊद हा पोलीस शिपायाचा मुलगा. तो लहानाचा मोठा झाला तो पोलीस लाईनमध्ये. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी त्याला व्यक्तिश: ओळखत होते. एवढेच काय माझ्या कारकिर्दीमध्ये त्याचे वडील नोकरीत होते. दाऊद एका दरोड्याच्या प्रकरणात दोषी ठरला होता व त्याला जामीनही मिळाला होता. लवकरच तो बेपत्ता झाला तो पुन्हा कधीही परतला नाही, असे रिबेरो म्हणाले. छोटा राजनच्या लोकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी जेव्हा जेव्हा कारवायां केल्या त्यामुळे दाऊदचे राज्य वाढायला मदतच झाली का, असे विचारले असता रिबेरो यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट यांना मोठे बनविण्यात आले होते. माझ्या अनुभवावरून मी सांगेन की परस्परांच्याविरोधातील दोन्ही टोळ््यांकडून या अधिकाऱ्यांना माहिती मिळत असे.आयबीच्या आज्ञेवरून छोटा राजनच्या लोकांनी दाऊदला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता का, असे विचारले असता रिबेरो यांनी मी जेव्हा पंजाबमध्ये १९८६-८९ या कालावधीत होतो त्यावेळी दाऊदला ठार मारण्याचा प्रयत्न भारतीयांनी केला होता अशी माझी माहिती होती व अशा माहितीमध्ये काही प्रमाणात सत्य असते, असे सांगितले. आयबी राजनची या बाबतीत मदत घेत असावी. कारण तसे नसते तर राजनला अटक करण्यासाठी थायलंडचे सहकार्य घेणे भारताला फार काही अवघड नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.