शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणजे पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनवरून देशाशी खोटं बोलले?; सोशल मीडियावर रणकंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:46 IST

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; सोशल मीडियावर लसीवरून वादळ

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांची अमेरिका दौरा तीन दिवसांचा असेल. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून याची माहिती दिली. मोदी अमेरिकेला रवाना होताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी देशाशी खोटं बोलले की अमेरिका भेदभाव करतेय, असे दोन प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

देशात दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण १ मार्चपासून सुरू झालं. पंतप्रधान मोदी सकाळी एम्स रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी कोवॅक्सिन घेतली. अमेरिकेनं कोवॅक्सिनला मंजुरी दिलेली नाही. कोवॅक्सिन घेतलेल्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जात नाही. मोदींनी कोवॅक्सिन घेतलीय आणि अमेरिकेनं त्या लसीला मान्यताच दिलेली नाही. मग मोदी अमेरिकेला कसे जात आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सोशल मीडियावर वादळपंतप्रधान मोदींनी खरंच कोवॅक्सिनच घेतलीय ना, असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत आहेत. अरमान नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या बायोमध्ये काँग्रेस कार्यकर्ता असा उल्लेख आहे. 'मोदींनी खरंच कोवॅक्सिन घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली लस घेतलेल्या व्यक्तींनाच अमेरिकेत प्रवेश आहे. कोविशील्ड किंवा फायझरची लस घेतली असेल तरच मोदी अमेरिकेचा दौरा करू शकतात. म्हणजे मोदींनी पुन्हा भारताला मूर्ख बनवलं आहे?', असा सवाल अरमान यांनी विचारला आहे.

अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्हकाही जणांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना टॅग करून प्रश्न विचारले आहेत. अमेरिका भेदभाव करत आहे का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनची लस घेतलेली असताना अमेरिकेत प्रवेश करू शकतात. मग बाकीचे भारतीय का करू शकत नाहीत? अमेरिकेची ही भूमिका भेदभाव करणारी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाKamala Harrisकमला हॅरिस