शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

तरुणांचा प्रश्न, नोक-या गेल्या कुठे? गुजरातमध्ये रोजगार शोधणा-यांचा मार्ग खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:27 IST

गुजरातमधील महामार्ग भलेही गुळगुळीत असतील; पण रोजगार शोधणा-या अनेक तरुणांचा मार्ग खूपच खडतर आहे. चांगले वेतन आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे.

राधनपूर/ पाटण : गुजरातमधील महामार्ग भलेही गुळगुळीत असतील; पण रोजगार शोधणा-या अनेक तरुणांचा मार्ग खूपच खडतर आहे. चांगले वेतन आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे. चायना मेड स्मार्टफोन आणि इअर फोनमध्ये गुंग झालेले असे अनेक तरुण दिसतील. आपल्या समस्यांपासून स्वत:ला दूर करीत हे तरुण फोनच्या माध्यमातून आभासी दुनियेत प्रवेश करतात. कधी बॉलीवूडचे गाणे तर कधी आणखी काही... त्यांच्यासाठी एवढाच दिलासा असतो.पाटणहून कच्छच्या गांधीधामला जाणारा प्रिंस परमार (२३) हा भूमिहीन शेतकºयाचा मुलगा. तो गांधीनगरमध्ये एका कपड्याच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. मासिक वेतन आहे १० हजार रुपये. दलित समुदायातील हा तरुण सांगतो की, आपण तीन दिवस जरी सुटी घेतली, तर अर्धा पगार कपात होतो. आपला राग काढत तो या पत्रकारालाच विचारतो की, तुम्ही किती कमावता? तुमचे शिक्षण काय आहे? गुजरातमध्ये दुसºया टप्प्यात १४ डिसेंबर रोजी होणाºया मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रिंससारख्या तरुणांचा प्रश्न आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. सत्तेच्या लढाईतील पक्षांनाही हा संदेश आहे.उत्तर गुजरातच्या ५५० किमी प्रवासात एक बाब दिसून आली की, राज्यातील तरुणांना ‘व्हाइट कॉलर’ जॉबबाबत खूप उत्सुकता आहे. राधनपूरचा वसीमभाई महबूबभाई आपल्या दोन मित्रांसह काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयात आला आहे. तो सांगतो की, शाळेनंतर त्याने आयटीआयचे प्रशिक्षण घेतले आहे. उपजीविकेसाठी तो लहानसहान कामे करतो, असे एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगताच महबूब म्हणाला की, हा चुकीचे बोलतोय. मी एका चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. परिस्थितीमुळे आपण शाळा सोडल्याचे तो सांगतो. त्याचे वडील ड्रायव्हर असून, महिना ५००० रुपये मिळवितात. हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वातील आरक्षणाच्या आंदोलनात तरुणांचा हाच राग दिसून आलेला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर लघु आणि मध्यम उद्योगांना आणि पर्यायाने रोजगाराला फटका बसल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017