शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

सवाल ठरले गुन्हेगारी : ४२ दिवस सुटका नाही झाली, नोकरीही गमवावी लागली; समाज माध्यमांवरील प्रश्नांमुळे तो गेला तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:22 IST

समाजमाध्यमांवर काही पोस्ट करताना किंवा काही भाष्य, मते व्यक्त करताना खूप काळजी घ्यावी लागेल. अन्यथा झाकिर अली (१८) याला ४२ दिवस तुरुंगात काढावे लागले, तशी वेळ येऊ शकते.

नवी दिल्ली : समाजमाध्यमांवर काही पोस्ट करताना किंवा काही भाष्य, मते व्यक्त करताना खूप काळजी घ्यावी लागेल. अन्यथा झाकिर अली (१८) याला ४२ दिवस तुरुंगात काढावे लागले, तशी वेळ येऊ शकते. झाकीर अलीने राम मंदिर बांधण्याच्या भाजपच्या आश्वासनावर समाजमाध्यमांवर वाद घातला आणि हज यात्रेसाठीचे अनुदान केंद्र सरकार का रद्द करीत नाही, असे मुद्दे उपस्थित केले. हे भाष्य उत्तर प्रदेश पोलिसांच्या दृष्टीने ‘गुन्हेगारी’ ठरले.त्याला त्यासाठी मुजफ्फरनगर तुरुंगात कुख्यात गुन्हेगारांसोबत ४२ दिवस काढावे लागले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ अन्वये आरोप ठेवून गेल्या २ एप्रिलच्या रात्री अटक झाली. त्याची ४२ दिवसांनंतर सुटका झाली असली तरी आरोपपत्रात पोलिसांनी देशद्रोहाचे कलम १२४ ए समाविष्ट केले आहे, असे त्याचे वकील काझी अहमद यांनी सांगितले. तो स्थानिक मदरशातील कार्यक्रमावरून आल्यानंतर आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, असे सांगून पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. तुझी काही तासांत सुटका होईल, असे मला सांगितले गेले होते, असे त्यागी वार्ताहरांशी बोलताना म्हणाला. पण ४२ दिवस तो तुरुंगातच होता. झाकीर अली ट्रकवर आठ हजाराच्या वेतनावर काम करायचा आता त्याची ती नोकरीही गेली. अटक झाली, त्या रात्री मला कोठडीत वाईट वागवले गेले, दहशतवादी म्हणून संबोधण्यात आले. त्याच्या फेसबुकवरील काही कॉमेंटसचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एका पोस्टमध्ये तो म्हणाला होता की गंगेला आता पवित्र अस्तित्व म्हणून जाहीर केले गेले आहे. त्यामुळे आता कोणी गंगेत बुडाला तर त्याच्यावर गुन्हेगारी आरोप ठेवणार का?काय लिहिले होते?-दुसºया पोस्टमध्ये त्यागीने हज यात्रेचे एअर इंडियाला दिले जाणारे अनुदान केंद्र सरकार रद्द का करत नाही, असे विचारले होते. राम मंदिर बांधण्याचे सरकारने दिलेले आश्वासन हे निवडणुकीसाठी केलेला खेळ होता व नंतरच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा हेच आश्वासन दिले जाईल, असेही त्याने फेसबुकवर म्हटले होते.जामिनासाठीच्या दुसºया अर्जावर न्यायालयाने प्रकरण गंभीर असल्याचे म्हटल्यामुळे त्यागीला ४२ दिवस तुरुंगात काढावे लागले. त्याला दिलासा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे त्याच्या वकिलाने सांगितले. प्रख्यात कायदेतज्ज्ञ व मानवी अधिकारांसाठी प्रयत्न करणारे अ‍ॅड कॉलिन गोन्सालविस यांच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाjailतुरुंग