शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:41 IST

Qatar Airways Flight Emergency Landing: दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानाचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानाचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने अहमदाबादविमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली. ही घटना आज (१४ ऑक्टोबर २०२५) दुपारच्या सुमारास घडली असून सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोहा ते हाँगकाँग या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच, दुपारी २:१२ वाजता अहमदाबाद विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानाचे दुपारी २:३२ वाजता सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत म्हणजे २.३८ वाजता 'पूर्ण आणीबाणी' मागे घेण्यात आली. या संपूर्ण घटनेदरम्यान विमानतळाचे कामकाज सुरळीत राहिले आणि इतर उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही.

विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद दिला. नेमके कशामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला? यामागचे कारण जाणून घेण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली. तसेच प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक ती व्यवस्था केली.

या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी, यामुळे बरोबर चार महिन्यांपूर्वी १२ जून २०२५ रोजी घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण गुजरात हादरले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर) उड्डाणानंतर केवळ १.७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आदळले होते. या दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेतून विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी बचावला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Qatar Airways flight emergency landing in Ahmedabad due to technical fault.

Web Summary : A Qatar Airways flight from Doha to Hong Kong made an emergency landing in Ahmedabad due to a technical issue. All passengers are safe. An investigation is underway. The incident recalls a fatal Air India crash four months earlier near the same airport.
टॅग्स :ahmedabadअहमदाबादAirportविमानतळ